गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:59 IST

Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं

नागोयातील हॉटेल्सच्या तुटवड्यावरून उठलेल्या चर्चेला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलं आहे.

Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जपानमधील आयची-नागोया इथे १९ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ ला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश असून भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ यात खेळणार आहेत. बीसीसीआयने या दोन्ही संघांची निवड आधीच जाहीर केली आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच खेळाडूंच्या राहण्याच्या सोयीबाबत चर्चांना उधाण आलं होतं.

नागोयात मोठ्या हॉटेल्सची संख्या कमी असल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू नेमकं कुठे राहणार, याबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. खेळाडूंसाठी वेगळी आणि स्वतंत्र निवासव्यवस्था करावी अशी मागणीही यातून पुढे येत होती. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खुलासा केला आहे.

भारतीय संघाच्या निरोप समारंभाच्या वेळी बोलताना शुक्ला यांनी सांगितलं की, आयोजकांनी जी निवासव्यवस्था ठरवून दिली आहे, तिथेच खेळाडू राहतील. बीसीसीआय आणि खेळाडू दोघंही सध्याच्या व्यवस्थेवर खूश आहेत, त्यामुळे वेगळं हॉटेल शोधण्याचा कोणताही विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शुक्ला पुढे म्हणाले की, आयोजकांनी खेळाडूंसाठी जी सोय केलेली आहे, तिथेच ते राहणार आहेत. खेळाडू कोणत्या हॉटेलमध्ये राहणार आहेत, यावर बीसीसीआयचं बारीक लक्ष आहे. त्यांच्या मते, ती हॉटेल्स फाईव्ह स्टार दर्जाची नसली, तरी चांगल्या सुविधा असलेली आहेत. हॉटेल्सचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर ती आरामदायक असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी हेही सांगितलं की खेळाडूंसमोर ओसाका किंवा टोकियोसारख्या दूरच्या ठिकाणी राहण्याचाही पर्याय होता, पण ती ठिकाणं स्पर्धेच्या ठिकाणापासून खूप लांब असल्यानं तो पर्याय निवडला गेला नाही आणि नागोयातीलच निवासस्थान कायम ठेवण्यात आलं. तसंच भारतीय क्रिकेटपटूंना एकत्र शेअरिंग रूममध्ये ठेवलं जाणार नसून प्रत्येकाला स्वतंत्र रूम दिली जाईल, असंही शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, भारतीय पुरुष क्रिकेट संघ २० सप्टेंबरला टोकियोकडे रवाना होणार आहे. तिथे २२ सप्टेंबरला भारत आणि जपान यांच्यात एक ऐतिहासिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. हा सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ सप्टेंबरला आशियाई खेळांमधला आपला पहिला सामना खेळेल, जो उपांत्यपूर्व फेरीचा असेल.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठीच्या भारतीय पुरुष क्रिकेट संघात श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ