गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:39 IST

डेंग्यूपासून लवकर बरं होण्यासाठी खा हे पदार्थ; डाएटमध्ये करा यांचा समावेश

डेंग्यू झाल्यावर योग्य आहार घेतला, तर लवकर रिकव्हरी होऊ शकते. काय खावं आणि काय टाळावं, ते जाणून घ्या.

डेंग्यूपासून लवकर बरं होण्यासाठी खा हे पदार्थ; डाएटमध्ये करा यांचा समावेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सध्या हवामानातल्या बदलामुळे साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. डास चावल्यामुळे पसरणारे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. डेंग्यूची लागण सुरुवातीलाच लक्षात आली, तर योग्य डाएट फॉलो करून त्यातून लवकर बाहेर पडता येतं. त्यामुळे डेंग्यू झाल्यावर नेमकं काय खावं, हे पाहणं गरजेचं आहे.

सगळ्यात आधी रोजच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सूप आणि फळांचा समावेश करायला हवा. फळांमध्ये केळं आणि सफरचंद हे विशेषतः जास्त प्रमाणात खायला हवं. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देऊन बरं होण्याच्या प्रक्रियेला मदत करतात.

चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी हर्बल टी घेतल्यास डेंग्यूमुळे आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडायला मदत होते. हवं असल्यास हर्बल टीमध्ये आलं किंवा वेलची टाकू शकता. यामुळे शरीराला आराम मिळतो.

डेंग्यू झाल्यावर जास्त प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिताना त्रास होत असला, तरी ते पिणं आवश्यक आहे. पाण्यातून ORS पावडर घेतल्यासही फायदा होतो, कारण त्यामुळे शरीरातलं डिहायड्रेशन होत नाही.

याशिवाय जास्तीत जास्त तरल पदार्थ घेतल्यास शरीरातला व्हायरस आणि विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. डेंग्यू झालेल्यांसाठी लिंबू हे वरदान मानलं जातं, त्यामुळे या दिवसांत लिंबूपाणी जास्त प्यायला हवं. यामुळे शरीरातला व्हायरल घटक लघवीवाटे बाहेर पडायला मदत होते.

डेंग्यूच्या आजारात सगळ्यात आधी शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात. त्या टिकवून ठेवण्यासाठी नारळपाणी प्यायला हवं.

जेवणात दलियाचा वापर केल्यास शरीरात एक प्रकारची एनर्जी टिकून राहते. दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करूनही खाता येते. हे पदार्थ पचायला हलके असल्यानं रुग्णासाठी उपयुक्त ठरतात.

डेंग्यू झाल्यावर रुग्णानं प्रोटीनने भरलेले पदार्थ जास्त खायला हवेत. यात अंड्याचा समावेश जेवणात करायला हवा. तसंच दूध आणि डेअरीचे पदार्थही प्रोटीनयुक्त आहारात घ्यायला हवेत. यामुळे डेंग्यू लवकर बरा होतो असं सांगितलं जातं.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे डेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार आणि जास्त आंबट पदार्थ टाळायला हवेत. या दिवसांत तोंडाला चव नसते, अशावेळी लिंबाचं लोणचं खाऊ शकता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ