गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:59 IST

जान्हवी किल्लेकरने दहीहंडीतील रागाच्या व्हिडिओमागचं खरं कारण सांगितलं

बिग बॉस मराठीमुळे फेमस झालेल्या जान्हवी किल्लेकरचा दहीहंडीच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर आता तिने स्वतः खुलासा केला आहे.

जान्हवी किल्लेकरने दहीहंडीतील रागाच्या व्हिडिओमागचं खरं कारण सांगितलं छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेली जान्हवी किल्लेकर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. दहीहंडीच्या एका कार्यक्रमात ती स्टेजवर माईक घेऊन उभी होती आणि त्या क्षणी तिचा राग अनावर झाल्याचं व्हिडिओत दिसत होतं.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. स्टेजवर जान्हवी उभी असताना अँकरने एका रीलस्टारचं नाव घेतलं आणि त्यानंतर लगेचच जान्हवी भडकल्याचं दिसलं, अशी चर्चा सुरू झाली. रीलस्टारच्या नावामुळेच जान्हवीचा जळफळाट झाला, असंही अनेकांनी बोलून दाखवलं. या सगळ्या गॉसिपवर आता खुद्द जान्हवीनेच उत्तर दिलं आहे.

अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, "खरं तर माझ्यासाठी हा विषयच महत्त्वाचा नाही. पण लोकांनी फक्त कॅप्शन वाचून काहीही अर्थ काढू नये. 'जान्हवी भडकली' असं लिहिलं की लोक लगेच विश्वास ठेवतात. आपण सगळेच कधी ना कधी रागावतो. मलाही राग येतो. पण मी सहसा पब्लिकमध्ये रिऍक्ट होत नाही. कधी कधी परिस्थिती अशी बनते की आपण रागावलोय हेच आपल्याला कळत नाही. नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरतात."

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, हेही जान्हवीने स्पष्ट केलं. ती म्हणाली, "त्यादिवशी मला तो इव्हेंट करून दुसऱ्या इव्हेंटला जायचं होतं. दीड तासाचा रस्ता होता. स्टेजवर सुरुवातीला कोणीच काही बोलत नव्हतं. फक्त डीजे वाजत होता आणि लोक नुसते उभे होते. कोणी नाचत पण नव्हतं. मग एक कलाकार म्हणून मला वाटलं की काहीतरी बोलायला हवं. मी आयोजकांना सांगितलं की माईक माझ्याकडे द्या, मी बोलते."

पुढे नेमका राग कशामुळे आला, हे सांगताना जान्हवी म्हणाली, "मी माईक घेतल्यावर अँकरला जाग आली. त्याने लगेच घोषणा केली. बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आपल्यासोबत आहेत, आणि लगेच त्याने त्या रीलस्टारचं पण नाव घेतलं. तो म्हणाला की या दोघी आता तुमच्याशी बोलणार आहेत, डायलॉग म्हणणार आहेत. मला तिथेच राग आला. अरे माईक माझ्या हातात आहे. मी बोलणार आहे. आणि तू दुसऱ्या कोणाचं नाव घेतोयस. कोणाच्या हातात माईक आहे आणि कोण बोलणार आहे याचं तरी भान ठेवा. मला त्या रीलस्टारचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम होता अँकरच्या बेशिस्तपणाचा. पण व्हिडिओमध्ये फक्त मी चिडलेली दिसले, त्यामागचं कारण कोणालाच कळलं नाही. लोक गैरसमज करतात."

जान्हवीने पुढे स्वतःच्या स्वभावाबद्दलही मन मोकळं केलं. ती म्हणाली, "बिग बॉसपासून लोकांना वाटतं मी आगाऊ आहे, सतत भडकते. पण तसं नाही. जर मी खरंच भडकत असते तर मला कोणी इव्हेंटला बोलावलं असतं का? मी आजपर्यंत इतके इव्हेंट केले आहेत. लोकांना माझा स्वभाव आवडतो म्हणूनच ते बोलावतात. हे लोकांना कळत नाही."

बिग बॉसमध्येसुद्धा जान्हवी अशीच होती, मनात जे असेल ते थेट तोंडावर बोलणारी. त्यामुळे तिचे चाहतेही तिच्या याच स्वभावावर फिदा आहेत. या व्हिडिओनंतर तिला ट्रोलही केलं गेलं होतं, मात्र आता तिने संपूर्ण प्रकरण स्पष्ट केलं आहे. तिचा राग त्या रीलस्टारवर नव्हता, तर अँकरने घातलेल्या गोंधळावर होता, हे तिने ठामपणे सांगितलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ