रविवार, 20 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
19 सप | 17:20  IIT बॉम्बे में स्टूडेंट की मौत, एग्जाम में ChatGPT यूज करने का मामला, 400 से ज्यादा स्टूडेंट्स का प्रदर्शन 19 सप | 16:40  नाशिक: नांदगांव में आठ महीने की बच्ची बिस्तर से गायब, अपहरण की आशंका 19 सप | 16:00  सावनेर में आंधी-बारिश का कहर, पेड़ गिरने और बिजली गिरने से दो लोगों की मौत 19 सप | 15:39  नागपुरात राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन, गडकरी-फडणवीसांची उपस्थिती, पुलाला डॉ. हेडगेवार यांचे 19 सप | 22:25  नागपुरात 'अमृत-2'ची सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई होणार: मुख्यमंत्री 19 सप | 21:54  दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार द्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही: सपकाळ यांचा इशारा
सर्व थेट अपडेट
00:44 IST

चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात सीसीटीव्ही व्हॅनसह १४ नवी वाहने दाखल

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केलेली दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन आणि १४ गस्ती वाहने पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पोलीस दलाच्या सेवेत दाखल.

चंद्रपूर पोलिसांच्या ताफ्यात सीसीटीव्ही व्हॅनसह १४ नवी वाहने दाखल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाला दोन अत्याधुनिक मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन आणि १४ नव्या गस्ती वाहनांची कुमक मिळाली आहे. ही सर्व वाहने जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) विशेष निधीतून खरेदी करण्यात आली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ही वाहने जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस सेवेसाठी समर्पित करण्यात आली. यावेळी प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 'सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर' या उद्दिष्टाला यामुळे गती मिळेल आणि पोलिसांच्या गस्तीचे जाळे अधिक भक्कम होईल, असे सांगण्यात आले.

कार्यक्रमाला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे आणि वरोऱ्याचे आमदार करण देवतळे उपस्थित होते. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश हेही हजर होते.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजिंक्य तांबडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे, पोलीस मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, राखीव पोलीस निरीक्षक किसन नवघरे आणि बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खरतड यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही यावेळी हजर होते.

नव्याने दाखल झालेल्या मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील संवेदनशील परिसर, राजकीय मोर्चे, आंदोलने, सण-उत्सवातील गर्दी तसेच आपत्कालीन प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही फिरती यंत्रणा प्रभावी ठरेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या व्हॅनवर ३६० अंशात फिरणारे पीटीझेड (PTZ) व नाईट-व्हिजन हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवण्यात आले असून ते दूरच्या परिसराचेही स्पष्ट चित्रण करू शकतात. हे कॅमेरे थेट पोलीस मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडलेले असल्याने वरिष्ठ अधिकारी मुख्यालयातून घटनास्थळावरील हालचालींवर लक्ष ठेवू शकतील.

व्हॅनमध्ये अत्याधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोरेज आणि गर्दी नियंत्रणासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्यात आली असून, ही गाडी एक प्रकारची फिरती तात्पुरती नियंत्रण कक्ष म्हणून काम करेल. अनुचित घटनांमध्ये तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि जलद प्रतिसादासाठी ही वाहने उपयोगी ठरतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. डीपीसीकडून मिळालेल्या इतर गस्ती वाहनांमुळे जिल्ह्यातील दुर्गम तसेच शहरी भागातील नियमित पोलीस गस्त वेगवान होईल आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस ठाणे आणि मुख्यालय कर्मचाऱ्यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ