शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:06 IST

गांधी चौकात मोदींच्या वाढदिवशी ३५ मुलींच्या हस्ते ७६ फुटी केक, मुनगंटीवारांचा पुढाकार

चंद्रपुरातील गांधी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 'आशीर्वादाचा दिवा' लावण्यात आला.

गांधी चौकात मोदींच्या वाढदिवशी ३५ मुलींच्या हस्ते ७६ फुटी केक, मुनगंटीवारांचा पुढाकार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपुरातील गांधी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमात मोदींच्या दीर्घायुष्यासाठी 'आशीर्वादाचा दिवा' लावण्यात आला. लहान मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि 'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता.

'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या संदेशासह आमदार मुनगंटीवार यांची नात शूरवी आणि आणखी ३५ लहान मुलींच्या हस्ते ७६ फुटांचा केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. वंचित, शोषित, गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आशा आणि विकासाचा प्रकाश आणणाऱ्या मोदींच्या सेवाभावाला या भावनिक कार्यक्रमातून चंद्रपूरने सलाम केला.

या कार्यक्रमाला महानगराच्या महापौर संगीताताई खांडेकर, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सपनाताई मुनगंटीवार, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रवी लोणकर, जयश्रीताई जुमडे, छबुताई वैरागडे, सुनीताताई जयस्वाल, सविताताई सरकार, प्रज्वलंत कडू, ब्रिजभूषण पाझारे, सूरज पेदूलवार, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, मुग्धाताई खांडे, नम्रता ठेमस्कर आणि शुभांगीताई शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'आशीर्वादाचा दिवा' हा फक्त एक दिवा नसून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचावी, गरिबांच्या घरात आनंद यावा आणि वंचितांच्या आयुष्यात विकासाचा प्रकाश यावा, यासाठीचा चंद्रपूरचा आशीर्वाद आहे. पंतप्रधान मोदींच्या हातून देशाची अशीच सेवा सुरू राहावी, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना महादेवाच्या चरणी केल्याचे त्यांनी सांगितले. पुढील ३६५ दिवसांत आजूबाजूला जिथे अंधार असेल तिथे विकासाचा दिवा घेऊन जाण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारने गरीब आणि वंचित घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेख करताना मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यांची नावे घेतली. गरिबांची बँक खाती उघडणे, घरोघरी गॅस आणि शौचालय पोहोचवणे, आरोग्य संरक्षण, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, नळाने पाणी आणि सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याची संधी या योजनांमधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास', 'आत्मनिर्भर भारत' आणि 'वोकल फॉर लोकल' या संकल्पनांचा उल्लेख करत मुनगंटीवार यांनी चांद्रयान-३ च्या यशाचाही उल्लेख केला. भारत आता जगाच्या मागे नाही तर जगाला सोबत घेऊन पुढे जाणारा देश आहे, असे ते म्हणाले. संसद भवन ही केवळ इमारत नसून लोकशाहीचे मंदिर आहे आणि जनता ईश्वराचा अंश आहे, या भावनेतून मोदी काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रपूरच्या विकासाबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यात ४७४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग तयार झाला असून पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात मोदींच्या प्रतिमेचे मुखवटे घालून शूरवीसह ३५ मुलींनी ७६ फुटांचा केक कापला. "बेटी पुढे गेली तर देश पुढे जाईल" हा संदेश यावेळी देण्यात आला. आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना महाकालीच्या चरणी केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ