रविवार, 20 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
13:59 IST

ब्रम्हपुरीत दारू पुरवठ्यावरून तरुणाला घरातून ओढून बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा

ब्रम्हपुरीत दारू पुरवठ्यावरून तरुणाला घरातून ओढून बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील सुंदरनगर भागात दारू पुरवठ्याच्या वादातून एका तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जेवत असलेल्या या तरुणाला घरातून ओढून बाहेर आणत मारहाण करण्यात आली आणि चाकूने संपवण्याची धमकीही देण्यात आली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सुंदरनगर, ब्रम्हपुरी येथे राहणारा ईशांत मोघल डांगे (वय १८) हा मजुरी करून पोट भरतो. वडिलांची तब्येत बरी नसल्याने घरखर्च चालवण्यासाठी तो आधी गडचिरोली जिल्ह्यात दारू पुरवण्याचं काम करत असे आणि दादू घरडे याच्याकडेच हे काम बघत होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याने हे काम पूर्णपणे सोडून दिलं होतं.

शुक्रवारी, १८ सप्टेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ईशांत घरी जेवत असताना गुरुदेव नगर येथील दादू प्रकाश घरडे (वय २८), गांधीनगर येथील काशिम शेख (वय २७) आणि फाशी चौक परिसरातील सौरभ आनंद (वय २२) हे तिघे अचानक त्याच्या घरी पोहोचले. "तू गडचिरोली जिल्ह्यात आमच्या ग्राहकांना दारू का पुरवतोस?" असं विचारत तिघांनी त्याच्याशी वाद घातला.

वाद वाढल्यावर आरोपींनी ईशांतला घरातून ओढत घराबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर आणलं. तिथे त्याला अश्लील शिवीगाळ करत "तू जिथे भेटशील तिथे चाकूने मारून टाकू" अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि दादू घरडे यानं ईशांतच्या दोन्ही गालांवर जोरदार चापटा मारल्या.

त्याच वेळी परिसरातील कुंदन सिंग, प्रेमकुमार सिंग आणि प्रिन्स सिंग हे घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी मध्यस्थी करत ईशांतला आरोपींच्या तावडीतून सोडवलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेला आणि प्रकृती अस्वस्थ असलेला ईशांत त्या रात्री लगेच पोलिसांकडे जाऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन गाठून घडलेली सगळी हकिकत सांगत तक्रार दिली.

ईशांत डांगे याच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९६ (अश्लील कृत्य व शिवीगाळ), ११५(२) (दुखापत करणे), ३३३ (अनाधिकाराने घरात घुसणे), ३५१(२) (धमकावणे) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्र येऊन गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम भारडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ