गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:39 IST

बेशुद्ध समजून अधिकारी गेला जवळ, आणि तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

कर्नाटकातील दावणगेरे इथे हायवेवर गाडीच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान वन अधिकाऱ्यावरच केलेला हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बेशुद्ध समजून अधिकारी गेला जवळ, आणि तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्नाटकातील दावणगेरे इथल्या एका हायवेवर गाडीच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला होता. या घटनेनंतर जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पण या बिबट्याने वाचवायला आलेल्या रेस्क्यू टीमवरच पलटवार केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रेस्क्यू टीमने आधी बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं होतं, जेणेकरून त्याला सहज ताब्यात घेता येईल. इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या शांत झाल्यासारखा वाटत होता, त्यामुळे टीमला वाटलं की आता तो आपल्या ताब्यात येईल. पण औषध पूर्णपणे त्याच्या शरीरात भिनण्याआधीच बिबट्याने अचानक एका वन अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. आपल्या पंजांनी त्याने अधिकाऱ्याला जमिनीवर पाडलं.

या अनपेक्षित हल्ल्यामुळे तिथे उपस्थित असलेले वन अधिकारी क्षणभर गोंधळून गेले. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरत बिबट्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचवेळी आजूबाजूला जमलेली लोकंही मदतीसाठी पुढे धावली. दरम्यान बिबट्याने गवताच्या दिशेने पळ काढून तिथून निसटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वन अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आणि योग्य वेळी हालचाल करत बिबट्याला सुरक्षितपणे पुन्हा ताब्यात घेतलं. त्यानंतर उपचारासाठी या बिबट्याला जवळच्या पशु रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ Deadly Kalesh या नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ८ सप्टेंबर २०२६ रोजी पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत लिहिण्यात आलं होतं की, दावणगेरे इथे हायवेवर गाडीच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान एका वन अधिकाऱ्यावर अचानक झेप घेतली. टीमने बिबट्याला बेशुद्ध करणारं इंजेक्शन दिलं होतं, पण औषधाचा पूर्ण परिणाम होण्याआधीच हा प्रकार घडला असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्सनी आपापल्या प्रतिक्रिया कमेंट्समधून व्यक्त केल्या. एका यूजरने लिहिलं की, बिबट्याला वाचवायला गेलेल्या रेस्क्यू टीमवरच हल्ला होणं खरंच धक्कादायक आहे. दुसऱ्या एका यूजरने गमतीत लिहिलं की, बिबट्याने रेस्क्यू टीमलाच सांगितलं, आज रेस्क्यू नाही, तुमची टेस्ट आहे. तर आणखी एका यूजरने कमेंट केली की, रेस्क्यू टीम म्हणाली आम्ही तुला वाचवायला आलोय, तर बिबट्या म्हणाला मला नाही, आधी स्वतःला वाचवा.

या घटनेत जखमी झालेल्या बिबट्यावर तसंच त्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वन अधिकाऱ्यावरही योग्य ते उपचार करण्यात आले असून बिबट्याला यानंतर पशु रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेकांनी वन अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचंही कौतुक केलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ