गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:22 IST

केस गळती थांबवायची आहे? आहारात या घरगुती पदार्थांचा समावेश करा, महिनाभरात फरक जाणवेल

वातावरणातील बदल, तणाव आणि पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. महागडे उपचार करण्याआधी आहारात काही सोपे पदार्थ समाविष्ट केल्यास केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते.

केस गळती थांबवायची आहे? आहारात या घरगुती पदार्थांचा समावेश करा, महिनाभरात फरक जाणवेल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

हल्ली वातावरणात होणारे सततचे बदल, कामाचा वाढता ताण, जेवणातून मिळणाऱ्या पोषक घटकांची कमतरता आणि केसांवर वारंवार वापरले जाणारे केमिकल प्रॉडक्ट यामुळे शरीराबरोबरच केसांच्या गुणवत्तेवरही परिणाम होताना दिसतो. केस निस्तेज आणि कोरडे झाल्यावर मोठ्या प्रमाणात गळायला लागतात. सुरुवातीला कोंडा, केस गळणे किंवा केस पातळ होणे यासारखी लक्षणे दिसली तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पुढे टक्कल पडण्यापर्यंत परिस्थिती गेल्यावर मात्र महागड्या ट्रीटमेंट आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर सुरू होतो. तरीही अनेकदा केसांच्या वाढीत फरक दिसत नाही, कारण केसांना वरून पोषण देण्याइतकेच आतून पोषण देणेही गरजेचे असते.

नवीन केस उगवण्यासाठी शरीराला प्रोटीन, झिंक, बायोटीन, विटामिन-सी, विटामिन-ई आणि ओमेगा-३ यासारख्या घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे महागड्या सप्लिमेंट्सऐवजी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. असे पदार्थ नियमित खाल्ल्यास महिनाभरात केस मजबूत आणि घनदाट होऊ शकतात.

आवळा हा केसांसाठी वरदान मानला जातो. आवळा, सुके खोबरे, खजूर आणि भाजलेले काळे तीळ मिक्सरमधून एकत्र वाटून त्याचे लाडू बनवावेत. हे लाडू रोज खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि केस सुंदर होतात. आवळ्यातील घटक आणि विटामिन सी केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करून केस मजबूत बनवतात.

याशिवाय रोजच्या आहारात उकडलेल्या स्प्राऊट्सचे चाट खाता येते. उकडलेले स्प्राऊट्स, कांदा, टोमॅटो, मसाले आणि लिंबाचा रस घालून हे चाट तयार करता येते आणि सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यावर कधीही खाता येते. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि ॲमिनो ॲसिड मुबलक असल्याने केसांची वाढ होऊन ते मजबूत होतात.

बारीक चिरलेला पालक, किसलेले पनीर, बेसन आणि मसाले एकत्र करून टिक्की बनवता येते, जी चवीलाही छान लागते आणि लहान मुलांच्या डब्यात किंवा नाश्त्यात देता येते. पालक खाल्ल्याने केसांची वाढ होतेच, शिवाय शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते. पनीर आणि पालकमध्ये आयर्न, फोलेट यासारखे प्रोटीनयुक्त घटक असतात.

भोपळ्याच्या बियाही केसांसाठी गुणकारी मानल्या जातात. टक्कल पडणे किंवा केसांच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भाजलेल्या भोपळ्याच्या बिया, बदाम, आक्रोड, सुके खोबरे आणि खजूर एकत्र करून लाडू बनवावेत. हे लाडू खाल्ल्याने केसांची वाढ होते आणि केस मजबूत, घनदाट बनतात. याशिवाय आवळा दह्यात मिसळून खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते आणि टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यासही मदत होते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामध्ये कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ