गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:25 IST

पीवायसी बॅडमिंटन लीगमध्ये नाडगोंडे रेव्हन्सची बेल्फिन्स टायगर्सवर ४-३ अशी थरारक मात

पीवायसी हिंदू जिमखानाच्या बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत नाडगोंडे रेव्हन्स संघाने अंतिम सामन्यात बेल्फिन्स टायगर्सचा ४-३ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी बॅडमिंटन लीगमध्ये नाडगोंडे रेव्हन्सची बेल्फिन्स टायगर्सवर ४-३ अशी थरारक मात
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पीवायसी हिंदू जिमखानाने आयोजित केलेल्या बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेचा फायनल शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या लढतीत नाडगोंडे रेव्हन्स संघाने बेल्फिन्स टायगर्स संघाला ४-३ असे नमवत करंडकावर नाव कोरले.

सामन्याची सुरुवातच रेव्हन्ससाठी दमदार झाली. गोल्ड खुल्या दुहेरीच्या पहिल्या सामन्यात रेव्हन्सच्या प्रतीक धर्माधिकारी आणि केदार नाडगोंडे या जोडीने टायगर्सच्या ईशान लागू आणि निखिल चितळे यांना १५-११, १५-१२ असे हरवत संघाला आघाडी मिळवून दिली. पण टायगर्सनेही लगेच प्रत्युत्तर दिले. खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात टायगर्सच्या मिहिर विंझे आणि प्रीती सप्रे यांनी रेव्हन्सच्या मनीष शहा आणि प्रांजली नाडगोंडे यांना १५-०३, १५-०७ असे नमवत सामना बरोबरीत आणला.

यानंतर टायगर्सने आघाडी घेतली. प्रौढ दुहेरीच्या चौथ्या सामन्यात अमोद प्रधान आणि आनंद घाटे यांनी अविनाश दोशी आणि समीर सावला यांचा १६-१४, १७-१५ असा पराभव करत टायगर्सला पुढे नेले. पण रेव्हन्सनेही हार मानली नाही. पाचव्या सामन्यात रेव्हन्सच्या चंद्रशेखर आपटे आणि विश्वास मोकाशी यांनी बाळ कुलकर्णी आणि परीक्षित देवल यांना २०-१८, १५-०९ असे नमवत पुन्हा बरोबरी साधली.

सहाव्या सामन्यात टायगर्सच्या कर्णा मेहता आणि यश मेहेंदळे यांनी रेव्हन्सच्या आशय कश्यप आणि विनित राठी यांचा ११-१५, १६-१४, १५-१३ असा पराभव करत पुन्हा आघाडी घेतली. मात्र सातव्या खुल्या दुहेरी सामन्यात रेव्हन्सच्या चिन्मय चिरपुटकर आणि पृथ्वी शहा यांनी अभिषेक ताम्हाणे आणि तनिश बेलगलकर यांना १५-१२, १५-०८ असे हरवत सामना ३-३ असा बरोबरीत आणला. त्यामुळे अंतिम निकाल मिश्र दुहेरीच्या सामन्यावर अवलंबून राहिला.

या निर्णायक सामन्यात रेव्हन्सच्या रिआन करंदीकर आणि सारा नवरे या जोडीने तन्मय चोभे आणि नेहा लागू यांचा १५-०७, १२-१५, १५-१० असा पराभव करत संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विजेत्या नाडगोंडे रेव्हन्स संघाला करंडक आणि पदके देऊन गौरवण्यात आले. पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, अमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत इतर पारितोषिकेही जाहीर झाली. सर्वोत्कृष्ट जोडी गोल्ड दुहेरीत केदार नाडगोंडे-प्रतीक धर्माधिकारी, सिल्वर दुहेरीत कर्णा मेहता-यश मेहेंदळे, ब्राँझ दुहेरीत अभिषेक ताम्हाणे-तनिश बेलगलकर, प्रौढ दुहेरीत मकरंद चितळे-अनिल देडगे तर मिश्र दुहेरीत रिआन करंदीकर-सारा नवरे या जोड्या ठरल्या. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरुष गटात प्रतीक धर्माधिकारी आणि कर्णा मेहता, महिला गटात सारा नवरे, तर प्रौढ गटात सिद्धार्थ साठे आणि हेमंत करमरकर यांची निवड झाली. अन्वित राजवाडे उदयोन्मुख खेळाडू ठरला, तर ईशान लागू-निखिल चितळे विरुद्ध अनिश राणे-कृष्णनिल गोरे हा सामना मॅच ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवला गेला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ