80s लूकच्या AI फोटोवर टोमणा; ऐश्वर्या नारकरांचं ठाम उत्तर, "काय पोस्ट करायचं ही माझी निवड"
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या ८०च्या दशकातील लूकच्या AI फोटोंवरून एका युजरने टोमणा मारला, तेव्हा तितीक्षा तावडे आणि खुद्द ऐश्वर्या यांनी दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इंस्टाग्रामवर सध्या 80s लूकचा ट्रेंड जोरात सुरू आहे. नेत्यांपासून मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सगळेच AI च्या मदतीने स्वतःचे जुन्या स्टाईलमधले फोटो बनवत आहेत. या ट्रेंडमध्ये मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर देखील मागे राहिल्या नाहीत. त्यांनी 80s लूकमधले वेगवेगळ्या स्टाईलचे AI फोटो असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओत ऐश्वर्या 80 च्या दशकातली साडी, तशीच हेअरस्टाईल आणि पूर्ण रेट्रो लूकमध्ये दिसत होत्या. फोटो खूपच सुंदर आले होते, पण याच फोटोंवरून काही जणांनी त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली आणि त्यातूनच एक मोठी चर्चा सुरू झाली.
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिलं की, तुम्ही तर खरोखरच 80s च्या आहात, मग तुमचे खरे 80s मधले फोटो का टाकत नाही. Gen Z पोरांना AI फोटो टाकावे लागतात कारण ते त्या काळात नव्हते, पण तुम्हाला कशाला AI ची गरज आहे. या कमेंटचा टोन टोमणेबाज असल्यामुळे ती वाचून अनेकांना वाईट वाटलं.
ही कमेंट बघून सर्वात आधी अभिनेत्री तितीक्षा तावडे यांनी त्या युजरला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, एवढी मोठी निगेटिव्ह कमेंट करायला तुमच्याकडे इतका वेळ आहे हे बघून मला तुमची दया येते. यावर तो युजर आणखी चिडला आणि तितीक्षा यांना म्हणाला की, तू कशाला मध्ये बोलतेस, मी ऐश्वर्या नारकर यांना बोललो होतो.
शेवटी खुद्द ऐश्वर्या नारकर या कमेंटमध्ये उतरल्या आणि त्यांनी अगदी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, कोणी काय पोस्ट करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे माझं पेज आहे आणि काय टाकायचं ही माझी निवड आहे, सो चिल. त्यांचं हे उत्तर वाचून तो कमेंट करणारा माणूस थोडा नरमला. तो म्हणाला की, मॅडम आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय, मी सहज बोललो की तुम्ही तुमचे खरे फोटो टाका, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी कमेंट डिलीट करतो.
यावर ऐश्वर्या पुन्हा म्हणाल्या की, प्रश्न वाईट वाटण्याचा नाहीये, प्रश्न बोलण्याच्या पद्धतीचा आहे, इतकंच. शेवटी त्या माणसाने ठीक आहे, मी माझी चूक सुधारतो असं म्हणत विषय तिथेच संपवला.
दरम्यान, ऐश्वर्यांच्या खऱ्या चाहत्यांनी त्यांच्या या 80s लूकचं भरभरून कौतुक केलं. अनेकांनी कमेंट करत लिहिलं की, तुम्ही कसाही लूक केला तरी गोडच दिसता आणि तुम्ही आमच्या फेवरेट आहात. सध्या ऐश्वर्या नारकर आमच्या लाडक्या नाईक बाई या मालिकेत झळकत आहेत आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. अशा छोट्या ट्रोलिंगमुळे त्या मागे हटणाऱ्यातल्या नाहीत, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं.