गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:38 IST

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी, घाटकोपरच्या भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल

जैन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी एक दिवस भिकाऱ्याचा वेष धारण करून रस्त्यावर भीक मागितली, याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी, घाटकोपरच्या भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

3 हजार कोटींहून जास्त संपत्ती असलेला माणूस मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसला तर लोक थबकून पाहतीलच. नेमकं असंच काहीसं घाटकोपरच्या रस्त्यावर घडलं आणि त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार फिरतोय. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला आधी धक्काच बसला, कारण जो माणूस भिकाऱ्याच्या वेषात रस्त्यावर फिरत होता, तो कुणी सामान्य व्यक्ती नव्हता.

व्हिडीओत दिसणारी व्यक्ती म्हणजे घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह. भिकाऱ्याच्या वेषात घाटकोपरच्या रस्त्यावर फिरणाऱ्या शाह यांना पाहून सुरुवातीला अनेकांना धक्का बसला, पण नंतर या मागचं कारण उघड झालं आणि लोकांच्या आश्चर्याचं रूपांतर उत्सुकतेत झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरू नम्रमुनी यांनी सुचवल्यावरून पराग शाह यांनी एक दिवस भिकारी म्हणून जगण्याचा अनुभव घेतला. सध्या जैन धर्मीयांचा चातुर्मास सुरू असून त्या काळात हा अनुभव घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. चातुर्मासाच्या या काळात धार्मिक शिकवणीचा भाग म्हणून त्यांनी हा वेगळा अनुभव घ्यायचं ठरवलं.

गुरूंची ही सूचना ऐकून शाह यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तू बाजूला ठेवल्या आणि थेट भिकाऱ्याचा वेष धारण केला. त्यानंतर ते काही तास घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरले. लोकांकडून त्यांनी भीक मागितली, मिळालेलं अन्न खाल्लं आणि रस्त्याच्या कडेला बसून एखाद्या सामान्य भिकाऱ्याचं आयुष्य जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या वेळात त्यांची ओळख कुणालाही कळू दिली नाही.

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटलंय की, आपल्या गुरूची आज्ञा पाळत पाच हजार कोटींचे मालक असलेले आमदार पराग शाह यांनी एक दिवस त्यांच्याच मतदारसंघात, घाटकोपर पूर्वमध्ये, भिकारी बनून घालवला. हा व्हिडीओ पोस्ट होताच काही मिनिटांतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरू लागला.

हा अनुभव फक्त वेष बदलण्यापुरता मर्यादित नव्हता. ज्या ज्या ठिकाणी ते भिकाऱ्याच्या रूपात गेले, तिथे नंतर मेकअप काढून पुन्हा गेले आणि तिथल्या लोकांशी बोलले. आपल्याला नेमकं काय जाणवलं, लोकांची प्रतिक्रिया कशी होती, हे त्यांनी समजून घेतलं. त्यामुळे हा सगळा प्रकार एखाद्या सिनेमातल्या सीनसारखा वाटतोय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या निमित्ताने पराग शाह यांच्या संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 3383 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते, आणि त्यांची ही आर्थिक स्थिती आता या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असलेले पराग शाह यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकही राहिले आहेत. आता त्यांचा हा वेगळा प्रयोग राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ