गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:07 IST

War Myths: पैगंबर जिहादसाठी आले, हाताने बॉम्ब पकडून फेकले; 1965 च्या युद्धात हरल्यावर पाकिस्तानात पसरलेल्या

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात लाहोर आणि सियालकोटपर्यंत भारतीय सैन्य पोहोचल्यावर पाकिस्तानात कोणकोणत्या अफवा पसरवल्या गेल्या, याचा हा आढावा.

War Myths: पैगंबर जिहादसाठी आले, हाताने बॉम्ब पकडून फेकले; 1965 च्या युद्धात हरल्यावर पाकिस्तानात पसरलेल्या छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

6 सप्टेंबर 1965 ची पहाट भारत-पाकिस्तान युद्धाच्या इतिहासातला एक मोठा टप्पा घेऊन आली होती. भारतीय लष्कराच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून थेट पाकिस्तानातल्या लाहोर आणि सियालकोट या शहरांच्या दिशेने कूच केलं होतं. ही शहरं कायमची ताब्यात घेणं हा या हल्ल्यामागचा हेतू नव्हता, तर जम्मू-काश्मीरच्या आघाडीवर दबाव टाकणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला मागे हटायला भाग पाडणं हा उद्देश होता. पण भारताच्या या अचानक झालेल्या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर पुरतं कोलमडलं आणि प्रत्यक्ष लढाईऐवजी तिथे काल्पनिक कथा आणि अफवांचं पेव फुटलं.

लाहोर आणि सियालकोटच्या वेशीवर भारतीय तोफा आणि रणगाड्यांचा आवाज ऐकू यायला लागल्यावर संपूर्ण पाकिस्तानात भीतीचं वातावरण पसरलं. लष्करी पातळीवर बचावाचा कोणताच ठोस मार्ग उरला नाही हे लक्षात आल्यावर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि तिथले धर्मगुरू यांनी लोकांचं खचलेलं मनोबल टिकवण्यासाठी धार्मिक चमत्कारांच्या कथा रचायला सुरुवात केली. या कथा फक्त मनोरंजनासाठी नव्हत्या, तर पाकिस्तानी लष्कराचा दारुण पराभव लपवण्यासाठी रचलेला एक मोठा लष्करी प्रचार होता.

भारतीय सैन्य लाहोरच्या दिशेने पुढे सरकत असताना तिथल्या रस्त्यांवर एक अफवा पसरली. 'चुप शाह' नावाचे मौन बाळगणारे एक स्थानिक धर्मगुरू अचानक रस्त्यावर आले आणि मोठ्याने सांगू लागले की अल्लाह चमत्कार करेल आणि विजय आपलाच होणार. पुढे भारतीय सैन्याने आपली रणनीती पूर्ण झाल्यावर लाहोरचा भाग रिकामा केला, कारण लाहोर शहर ताब्यात ठेवणं हा भारताचा राजकीय हेतूच नव्हता. पण पाकिस्तानने याला 'अल्लाहचा चमत्कार' म्हणत स्वतःच्या विजयाचा खोटा दावा केला. त्याच वेळी सियालकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्याचा जोरदार मारा सुरू होता. भारतीय सैन्याला रोखणं अशक्य झाल्यावर तिथे अशी अफवा पसरवली गेली की शहरात पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि हातात तळपत्या तलवारी असलेले शेकडो घोडेस्वार फिरत आहेत. हे घोडेस्वार माणसं नसून अज्ञातातून आलेले अल्लाहचे दूत आहेत आणि ते जिहादसाठी थेट रणभूमीवर चालले आहेत, असा दावा लोकांमध्ये पसरवला गेला. या खोट्या कहाण्यांना पाकिस्तानातल्या स्थानिक उर्दू वृत्तपत्रांनी उघडपणे बळ दिलं. एका उर्दू दैनिकात छापलेल्या पत्रानुसार, सौदी अरेबियातल्या मदिना शहरात दोन व्यक्तींना एकाच रात्री स्वप्न पडलं, ज्यात पैगंबर घोड्यावरून जाताना दिसले. ते कुठे चालले आहेत असं विचारल्यावर "पाकिस्तानात जिहादसाठी चाललो आहे" असं उत्तर त्यांनी दिल्याचं वृत्तपत्रात छापण्यात आलं. यासोबतच युद्धात पकडलेल्या भारतीय सैनिकांच्या नावाने अत्यंत हास्यास्पद दावेही छापले गेले. सियालकोट आणि खेमकरण सेक्टरमध्ये पकडलेले भारतीय सैनिक म्हणाले, की रणभूमीवर लाल आणि पांढऱ्या कपड्यातले घोडेस्वार पाहून आम्ही चक्रावून गेलो, कारण त्यांच्या तलवारींमधून विलक्षण प्रकाश बाहेर पडत होता. अशा कहाण्या छापून पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्याचा आणि आपल्याच सैन्याचा पराभव झाकण्याचा पुरता प्रयत्न करण्यात आला.

पाकिस्तानी प्रचार इथेच थांबला नाही. मुलतान शहरात भारतीय हवाई दलाने बॉम्बफेक केली, तेव्हा तिथे उपस्थित तीन वृद्ध व्यक्तींनी भारतीय विमानांतून पडणारे जिवंत बॉम्ब हाताने पकडून दूर फेकले, असा दावा करण्यात आला. पेशावरमधल्या एका एअरबेसवर पडलेला भारतीय बॉम्ब पेट्रोलच्या टाकीवर पडूनही फुटला नाही, यालाही दिव्य चमत्कार ठरवलं गेलं. या सगळ्यांत सर्वात जास्त गाजलेली आणि खोटी कथा रचली गेली ती भारताचे तरुण पायलट आणि पुढे एअर मार्शल बनलेले के. सी. करिअप्पा यांच्याबद्दल. 1965 च्या युद्धात करिअप्पा यांचं विमान पाडण्यात आलं आणि पाकिस्तानने त्यांना युद्धकैदी बनवलं. या घटनेभोवती पाकिस्तानने अशी कथा रचली, की करिअप्पा रावी नदीवरचा एकमेव पूल उडवण्यासाठी आले होते, पण पुलावरून उडताना त्यांना एकाऐवजी 6 वेगवेगळे पूल दिसले, त्यामुळे ते गोंधळले आणि त्यांचं विमान पाडलं गेलं.

या सगळ्या स्वप्नाळू कथा, अफवा आणि काल्पनिक दाव्यांचा प्रत्यक्ष रणभूमीत पाकिस्तानी लष्कराला काहीही उपयोग झाला नाही. युद्धबंदी जाहीर होईपर्यंत भारतीय सैन्याने लाहोर आणि सियालकोटच्या अगदी जवळ आपली मजबूत ठाणी उभी केली होती. या युद्धाच्या काळात भारताने पाकिस्तानचा मोठा भूभाग ताब्यात घेतला होता आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं होतं.

आज एक मोठी ऐतिहासिक गंमत अशी, की 1965 च्या युद्धात भारतीय सैन्याने लाहोरबाहेर ताब्यात घेतलेली गावं आज लाहोर या महानगराचा भाग बनली आहेत. विशेष म्हणजे भारतीय सैन्याने 1965 मध्ये जिथे धडक मारली होती, त्याच जागी आज पाकिस्तानी लष्कराची 'डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी' (DHA) आपल्या अधिकाऱ्यांसाठी आलिशान प्लॉट विकसित करत आहे. 1965 मधला पराभव लपवण्यासाठी रचलेला हा अफवांचा खेळ आजही पाकिस्तानच्या लष्करी इतिहासातला एक हास्यास्पद धडा मानला जातो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ