गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:41 IST

Samsung Galaxy A07s: 15 हजारांच्या घरात नवा बजेट फोन, मोठा डिस्प्ले आणि 6 OS अपडेट्स

सॅमसंगने बजेट सेगमेंटमध्ये Galaxy A07s हा नवा 4G स्मार्टफोन आणला असून मोठा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि दीर्घकाळ सॉफ्टवेअर सपोर्टमुळे हा फोन पहिल्यांदाच स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Samsung Galaxy A07s: 15 हजारांच्या घरात नवा बजेट फोन, मोठा डिस्प्ले आणि 6 OS अपडेट्स छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सॅमसंगने बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपला नवा Galaxy A07s हा फोन लाँच केला आहे. फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या आणि आयुष्यात पहिल्यांदाच स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून हा 4G फोन बनवण्यात आला आहे. किंमत आकर्षक असणे, डिस्प्ले मोठा असणे आणि सॉफ्टवेअर अपडेट्स दीर्घकाळ मिळत राहणे या तीन गोष्टींमुळे हा फोन बजेट ग्राहकांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

Samsung Galaxy A07s सध्या जॉर्डनमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला याचा बेस व्हेरिएंट साधारण Rs 15,000 किमतीत मिळतो. हा फोन Black, Light Violet आणि Green अशा तीन रंगांत उपलब्ध आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर Galaxy A07s मध्ये 6.7 इंचाचा HD+ PLS LCD डिस्प्ले देण्यात आला असून तो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामुळे सोशल मीडिया स्क्रोल करणं, व्हिडिओ बघणं आणि रोजचा वापर आणखी स्मूथ होईल अशी अपेक्षा आहे. शिवाय फोनला धूळ आणि हलक्या पाण्याच्या तुषारांपासून बचावासाठी IP54 रेटिंगही मिळालं आहे, जे या किंमतीतल्या फोनसाठी खासच म्हणावं लागेल.

कॅमेऱ्याच्या बाबतीत फोनच्या मागच्या बाजूला 50MP चा मुख्य ऑटोफोकस कॅमेरा आणि त्यासोबत 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी काढायच्या किंवा व्हिडिओ कॉल करायच्या असतील तर पुढच्या बाजूला 8MP चा कॅमेरा मिळतो. बॅटरीच्या बाबतीत 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून सामान्य वापरात दिवसभराचा बॅकअप मिळेल असं सांगितलं जातंय.

परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Helio G99+ हा चिपसेट बसवण्यात आला आहे. फोन 4GB RAM आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेज पर्यायात मिळतो, आणि microSD कार्डच्या मदतीने ही स्टोरेज तब्बल 2TB पर्यंत वाढवताही येते. त्यामुळे फोटो, व्हिडिओ, अॅप्स असं भरपूर सामान साठवणाऱ्या युजर्सना याचा फायदा होणार आहे.

पण या फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सॉफ्टवेअर सपोर्ट. Galaxy A07s हा Android 16 वर आधारित One UI वर चालतो आणि सॅमसंगने या फोनला तब्बल 6 मोठे OS अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं आहे. बजेट सेगमेंटमधल्या बहुतेक फोनना साधारण 2 ते 3 मोठे OS अपडेट्सच मिळतात, त्या तुलनेत 6 अपडेट्स मिळणं ही ग्राहकांसाठी नक्कीच फायद्याची गोष्ट आहे. फोन दीर्घकाळ वापरायचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो.

मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी, भरपूर स्टोरेज आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट शोधणाऱ्या बजेट ग्राहकांसाठी Galaxy A07s हा चांगला पर्याय ठरू शकतो, खासकरून फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे येणाऱ्या युजर्ससाठी. मात्र ज्या ग्राहकांना हाय रिझोल्यूशन डिस्प्ले, फास्ट चार्जिंग किंवा जास्त दमदार गेमिंग परफॉर्मन्स हवा आहे, त्यांना याच किमतीतल्या इतर फोनचा विचार करावा लागू शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ