गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

वर्धा शहर पोलिसांच्या डीबी पथकाकडून मोटर सायकल चोरीचा उलगडा, आरोपीला अटक

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वर्धा शहर पोलिसांच्या डीबी पथकाकडून मोटर सायकल चोरीचा उलगडा, आरोपीला अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने मोटर सायकल चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास करून त्यातील आरोपीला अटक केली आहे. सेलू, जि. वर्धा येथे राहणारे शादाब मन्सुरी इकबाल मन्सुरी (वय 23) हे या गुन्ह्यातील तक्रारदार आहेत. त्यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्पेंडर एक्सटीईसी मोटर सायकल, क्रमांक एम.एच. 32 एव्ही 0427, किंमत 75,000 रुपये, दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत चोरीला गेली होती.

शादाब हे त्या दिवशी कामानिमित्त वर्धा येथील डागा हॉस्पिटलमध्ये गेले असता तिथून कोणीतरी अनोळखी चोरट्याने त्यांची मोटर सायकल लांबवली. या प्रकरणी शादाब यांच्या तोंडी जबाबावरून वर्धा (शहर) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये अपराध क्रमांक 1510/2026 नोंदवण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमले. या पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तसेच एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासातून वालदूर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील रहिवासी महेश अंबादास वांढरे (वय 42) हा या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सध्या तो काटवे यांच्या घरी गोंड प्लॉट, केजाजी चौक, वर्धा येथे भाड्याने राहत होता.

पोलिसांनी महेश वांढरे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयातून पोलीस कोठडी (पीसीआर) मिळवून पुढील तपास करण्यात आला. आरोपीने चोरलेली तक्रारदाराच्या मालकीची हिरो स्पेंडर एक्सटीईसी मोटर सायकल, क्रमांक एम.एच. 32 एव्ही 0427, किंमत 75,000 रुपये, पोलिसांनी जप्त केली.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांच्या निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार प्रशांत वंजारी (1378), पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे (1444), पोलीस हवालदार महेंद्र पाटील (523), पोलीस अंमलदार वैभव जाधव (1599) आणि श्रावण पवार (1342) या सर्व वर्धा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी हे वर्धा शहर पोलीस ठाण्यातर्फे करत असून, तपासादरम्यान आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ