गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:21 IST

Baleno-Altroz विसरा! 14 ऑक्टोबरला लॉन्च होतेय Toyota ची ही नवी कार, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त...

टोयोटा ग्लान्झाच्या फेसलिफ्ट आवृत्तीत नवे इंजिन, ADAS सिस्टीमसह भन्नाट फीचर्स आणि नवा लूक मिळणार आहे.

Baleno-Altroz विसरा! 14 ऑक्टोबरला लॉन्च होतेय Toyota ची ही नवी कार, भन्नाट फीचर्स अन् किंमत फक्त... छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टोयोटाचे चाहते सध्या ग्लान्झाच्या फेसलिफ्टची वाट पाहत आहेत, आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी आपल्या या प्रीमियम हॅचबॅकची फेसलिफ्ट आवृत्ती 14 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. ही नवी कार ऑक्टोबर 2026 मध्ये बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट लॉन्च करण्याच्या तयारीत असून यात भन्नाट फीचर्स दिले जाणार आहेत.

या फेसलिफ्टमध्ये ADAS सिस्टीम, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखे भन्नाट फीचर्स दिले जाऊ शकतात. सध्याच्या मॉडेलमध्ये असलेल्या 1.2 लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनऐवजी नव्या ग्लान्झामध्ये 1.2 लिटर, तीन-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिन बसवले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 83 एचपी पॉवर आणि 112 एनएम टॉर्क देते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या दोन्ही पर्यायांसह मिळू शकते. याशिवाय सीएनजी मॉडेलचा पर्यायही उपलब्ध राहण्याची शक्यता असून तो सुमारे 70 एचपी पॉवर देऊ शकतो आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.

डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास, सध्याच्या ग्लान्झाचा फ्रंट भाग वगळता उर्वरित लूक बलेनोच्या प्री-फेसलिफ्ट मॉडेलसारखाच आहे. हा फ्रंट भाग फेसलिफ्ट आवृत्तीतही तसाच ठेवला जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नव्या ग्लान्झात वेगळी ग्रिल आणि नवा फ्रंट बंपर पाहायला मिळू शकतो. लायटिंग एलिमेंट्स, अलॉय व्हील्स आणि मागचा बंपर मात्र जुन्याच मॉडेलसारखा राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच बाहेरून कारचा एकूण साचा फारसा बदलणार नसला तरी पुढच्या भागात थोडा फरक जाणवेल.

इंटिरियरमध्येही काही नवे फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे. यात लेव्हल-2 ADAS, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, व्हेंटिलेशनसह वायरलेस फोन चार्जर आणि TPMS यांचा समावेश असू शकतो. याशिवाय 9 इंचाचा स्मार्टप्ले डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले आणि 360 डिग्री सराऊंड-व्ह्यू कॅमेराही दिला जाऊ शकतो. मात्र या कारमध्ये सनरूफ किंवा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने कार अपग्रेड होणार असली, तरी काही प्रीमियम फीचर्स मात्र यात दिसणार नाहीत असा अंदाज आहे.

किंमतीबाबत बोलायचे झाले तर, नवे इंजिन आणि जास्तीचे फीचर्स पाहता नव्या ग्लान्झाची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा किंचित जास्त असण्याची अपेक्षा आहे. सध्या ग्लान्झाची किंमत Rs 6.73 लाख ते Rs 9.99 लाख (एक्स-शोरूम) या दरम्यान आहे. फेसलिफ्टमुळे यात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यानंतर नवी ग्लान्झा बलेनो, टाटा अल्ट्रोझ आणि ह्युंदाई आय20 यांसारख्या प्रीमियम हॅचबॅक गाड्यांशी स्पर्धा करेल. त्यामुळे या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ