गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:49 IST

SSC CGL २०२६ चे वेळापत्रक जाहीर, टियर-१ परीक्षेचा पॅटर्न बदलला

कर्मचारी निवड आयोगाने सीजीएल परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले असून टियर-१ परीक्षेत वेळेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.

SSC CGL २०२६ चे वेळापत्रक जाहीर, टियर-१ परीक्षेचा पॅटर्न बदलला
एआयने तयार केलेले प्रातिनिधिक चित्र; हे प्रत्यक्ष घटनेचे छायाचित्र नाही | PT24

कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच एसएससीने सीजीएल परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एसएससी सीजीएल टियर-१ परीक्षा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर अनेक शिफ्टमध्ये ही परीक्षा कॉम्प्युटरबेस्ड म्हणजे सीबीटी पद्धतीने घेतली जाणार आहे. या भरतीतून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत आणि सरकारी कार्यालयांत एकूण १२,२५६ जागांवर नियुक्त्या होणार आहेत. यात असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इनकम टॅक्स इन्स्पेक्टर, सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि ऑडिटर अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

टियर-१ परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून हा पेपर २०० गुणांचा असेल. प्रत्येक विभागातून २५-२५ प्रश्न असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये २५ प्रश्न म्हणजे ५० गुण असतील, ज्यात व्हर्बल-नॉन व्हर्बल, कोडिंग-डिकोडिंग, नंबर सिरीज, वेन डायग्राम आणि लॉजिकल रिझनिंग यांसारख्या घटकांचा समावेश असेल. जनरल अवेअरनेसमध्येही २५ प्रश्न म्हणजे ५० गुण असतील, यात चालू घडामोडी, इतिहास, संस्कृती, भूगोल, अर्थशास्त्र आणि वैज्ञानिक संशोधन यावर प्रश्न विचारले जातील. क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडमध्ये गणितीय क्षमता आणि आकड्यांवर आधारित २५ प्रश्न म्हणजे ५० गुण असतील, तर इंग्लिश कॉम्प्रिहेंशनमध्ये भाषा समजण्याची आणि बेसिक लेखनाची क्षमता तपासणारे २५ प्रश्न म्हणजे ५० गुण असतील.

यंदा एसएससी सीजीएल २०२६ च्या पॅटर्नमध्ये वेळेच्या बाबतीत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. टियर-१ परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण ६० मिनिटांचा वेळ मिळणार आहे, आणि प्रत्येक विभागासाठी १५ मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. १५ मिनिटे पूर्ण होताच तो विभाग ऑटो-सबमिट होऊन लॉक होईल आणि लगेच पुढचा नवा विभाग सुरू होईल. यामुळे उमेदवारांना आधी सोडवलेल्या विभागाकडे परत जाता येणार नाही, म्हणजेच एकदा एखादा विभाग पुढे गेला की त्यातील प्रश्न पुन्हा सोडवता येणार नाहीत. इंग्रजी विषय वगळता बाकी सर्व प्रश्न हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत उपलब्ध असतील. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील, म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग लागू राहील.

परीक्षेच्या साधारण ९ ते १२ दिवस आधी उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची आणि अर्जाच्या स्थितीची माहिती दिली जाईल. ॲडमिट कार्ड मात्र परीक्षेच्या फक्त २ ते ३ दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

एसएससी सीजीएलची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. टियर-१ परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर-२ साठी पात्र ठरतील, आणि टियर-२ परीक्षा डिसेंबर २०२६ मध्ये होण्याचे प्रस्तावित आहे. उमेदवाराची अंतिम निवड टियर-१ आणि टियर-२ या दोन्ही परीक्षांमधील कामगिरीच्या आधारावर केली जाईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ