गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

छप्परफाड रिटर्न... शेअर बाजार कोसळला, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या ५ दिवसांत पैसे झाले दुप्पट

छप्परफाड रिटर्न... शेअर बाजार कोसळला, तरी या शेअर्सचा तुफान धमाका; अवघ्या ५ दिवसांत पैसे झाले दुप्पट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. बीएसई सेन्सेक्स १,७३३.६७ अंकांनी म्हणजेच २.२६ टक्क्यांनी घसरून ७४,७८१.७६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ४९९.६ अंकांनी म्हणजेच २.०९ टक्क्यांनी घसरून २३,३९८.१० अंकांवर बंद झाला. मार्केट एकूणच लाल रंगात बंद झालं, म्हणजे आठवड्याभरात बाजाराने नुकसानच दाखवलं. पण या घसरणीतही काही निवडक शेअर्सनी मात्र जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना ९१ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला. सर्वसाधारण बाजार खाली असतानाही या ठराविक शेअर्सनी वेगळी दिशा दाखवली आणि गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत मोठ्या प्रमाणात वाढवले.

यात सर्वात पुढे राहिला तो नुकताच लिस्ट झालेला ESDS सॉफ्टवेअरचा शेअर. या शेअरने गेल्या आठवड्यात ९१.६५ टक्के परतावा देत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले. आठवड्याभरात हा शेअर ८९५.५५ रुपयांवरून १,७१६.३५ रुपयांपर्यंत वाढला. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर १० टक्क्यांनी वाढून १,७१६.३५ रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल २०,११७.५० कोटी रुपये इतके आहे.

दुसऱ्या क्रमांकावर अनमोल इंडियाचा शेअर राहिला, ज्यात ६९.२२ टक्क्यांची वाढ झाली. या शेअरची किंमत १०.०४ रुपयांवरून १६.९९ रुपयांपर्यंत वाढली. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर १० टक्के वाढीसह १६.९९ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल ९६.०१ कोटी रुपये आहे.

मार्बल सिटी इंडियाचा शेअरही आठवड्यात ६८.१० टक्क्यांनी वधारला. हा शेअर १०२.५० रुपयांवरून १७२.३० रुपयांपर्यंत गेला. शुक्रवारी बीएसईवर १९.२८ टक्के वाढीसह तो १७२.३० रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल ४४८.५० कोटी रुपये इतके आहे.

लॅडरअप फायनान्सच्या शेअरने आठवड्यात ६३.२४ टक्क्यांची वाढ नोंदवली. हा शेअर ४७.५० रुपयांवरून ७७.५४ रुपयांपर्यंत पोहोचला. शुक्रवारी बीएसईवर १८.१३ टक्के वाढीसह तो ७७.५४ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल ७० कोटी रुपये आहे.

पाचव्या क्रमांकावर सन रिटेलचा शेअर होता, ज्यात ५८.०६ टक्क्यांची वाढ झाली. आठवड्याभरात या शेअरची किंमत ०.३१ रुपयांवरून ०.४९ रुपयांपर्यंत वाढली. शुक्रवारी बीएसईवर ८.८९ टक्के वाढीसह हा शेअर ०.४९ रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल ७.६० कोटी रुपये इतके आहे.

ही सर्व आकडेवारी फक्त शेअर बाजाराशी संबंधित माहिती देण्यासाठी दिली आहे, ही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, याचा अर्थ बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणुकीत नुकसान होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याआधी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ