गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:47 IST

नवी जबाबदारी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू - खासदार राजेंद्र जैन

आमगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि विकासकामांचा पाठपुरावा करण्याचा शब्द

नवी जबाबदारी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू - खासदार राजेंद्र जैन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्टेशन रोडवरील विजया लक्ष्मी सभागृहात एक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून खासदार राजेंद्र जैन उपस्थित होते. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तूरकर, माजी म्हाडा सभापती नरेश कुमार माहेश्वरी, सुरेश हर्षे आणि केतन तुरकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना खासदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, खासदारपदी निवड झाल्यापासून आपल्यावर या क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. ही जबाबदारी विकासकामांच्या माध्यमातूनच सार्थ ठरवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि शेतमजूर यांच्या पाठीशी सातत्याने उभे राहून त्यांच्या हितासाठी सदैव काम केल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना बोनस मिळावा तसेच त्यांची कर्जातून मुक्तता व्हावी यासाठी नेहमीच सकारात्मक पाठपुरावा केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला गती देण्यासाठी आतापर्यंत सातत्याने प्रयत्न केले असून, यापुढेही हे काम अधिक जोमाने सुरू ठेवण्यात येईल, असे खासदार जैन यांनी स्पष्ट केले. आमगाव परिसराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यामध्ये विशेषतः आमगाव रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा उल्लेख करत खासदार जैन यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मविश्वासाने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून तेथील नागरिकांच्या समस्या समजून घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या सत्कार सोहळ्याला प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मीताई तुरकर, कमलबापू बहेकार, राजेश भक्तवर्ती, टीकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, जियालाल पंधरे, अनिल शर्मा, गणेश हर्षे, पियूष झा, सुभाष यावलकर, चुन्नीलाल शहारे, संजय रावत, रवि क्षिरसागर, स्वप्नील कावडे, रवींद्र मेश्राम, लोकनाथ हरिणखेडे, महेंद्र राहांगडाले, प्रमोद शिवणकर, गिरी महाराज, तुलेंद्र कटरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ