गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

प्रिया बापट-उमेश कामतच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी मुंबईत घेतलेल्या नव्या घराचे फोटो आर्किटेक्ट सत्यजीत पटवर्धन यांनी शेअर केले असून, साध्या पण सुंदर सजावटीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

प्रिया बापट-उमेश कामतच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठीत सगळ्यात जास्त आवडलं जाणारं कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. दोघंही उत्तम कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यातही त्यांचं नातं मस्त आहे. सध्या या दोघांच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे फिरत असून, लोक घराचं कौतुक करताना दिसत आहेत.

मागच्या वर्षी या दोघांनी मुंबईत स्वतःचं नवीन घर घेतलं होतं. मोठा बंगला किंवा आलिशान फ्लॅट घेण्याऐवजी त्यांनी साधं, सुंदर आणि मनाला शांतता देणारं घर निवडलं असल्याचं समजतंय. हे घर सुमारे 1500 स्क्वेअर फूटचं असून त्याची सजावट अशी केलीये की बघतच राहावंसं वाटतं.

या घराचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळाचा टच आणि मॉडर्न लूक यांचा एकत्र मेळ. घरात शिरल्यावर किचनच्या दाराजवळ जुन्या काळातल्या रेलिंगसारखी रचना केलेली आहे. हॉलच्या मधोमध सागवानी लाकडाचा मोठा खांब उभा असून, त्यामुळे घराला जुन्या वाड्यासारखा फील येतो. भिंतींमध्येच कपाटं बसवली असल्यामुळे जागा वाया जात नाही. हॉलमधल्या कपाटाला ओपन-ग्रेन व्हेनिअर लावलंय, ज्यामुळे रॉ आणि अस्सल लूक मिळतो.

घराच्या भिंती मशीनने नाही तर हाताने ब्रशने रंगवलेल्या आहेत, त्यामुळे एक वेगळा टेक्शचर तयार झालाय. फरशीसाठी राखाडी आणि पांढऱ्या सिमेंटच्या टाइल्स एका आड एक बसवल्या असून, त्या बुद्धिबळाच्या पटासारख्या दिसतात. घराचा मुख्य रंग बेज आणि ऑफ-व्हाईट ठेवला असून, मध्ये मध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा हलका टच दिलाय, त्यामुळे घर जिवंत वाटतं.

घरातला सगळ्यात खास भाग म्हणजे हॉलमधला झोपाळा. संध्याकाळी या झोपाळ्यावर बसलं की बाहेरून पक्ष्यांचा आवाज आणि फुलांचा वास येतो, त्यामुळे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही एकदम शांत वाटतं. या घरात वेगळं मोठं डायनिंग टेबल नाहीये. किचनला लागूनच छोटा ब्रेकफास्ट काउंटर बनवलाय, जिथे दोघे बसून चहा पितात, जेवतात आणि गप्पा मारतात. वेगळं टेबल नसल्यामुळे घर अधिक मोकळं आणि मोठं वाटतं.

हे घर आर्किटेक्ट सत्यजीत पटवर्धन यांनी डिझाइन केलंय आणि त्यांनीच याचे फोटो आणि माहिती शेअर केली. प्रिया आणि उमेशला साधं पण बालपणीच्या आठवणी जपणारं घर हवं होतं, असं त्यांनी सांगितलं. फोटो पाहून सोशल मीडियावर लोक कमेंट करत आहेत की एवढे मोठे स्टार असूनही घरात कुठेही जास्त दिखावा नाही, सोनं-चांदी नाही, फक्त लाकूड, हाताने रंगवलेल्या भिंती आणि भरपूर उजेड आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ