Big Billion Days सेलची तारीख लीक, 9 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार
फ्लिपकार्टने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमधून सेलची तारीख आणि बँक ऑफर्स समोर आल्या आहेत.
दिवाळीच्या आधी येणाऱ्या फ्लिपकार्टच्या Big Billion Days सेलची सगळेच वाट बघत असतात, आणि यंदाही ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कंपनीने अजून अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, पण सध्या एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामुळे सेलची तारीख आधीच लीक झाल्याची चर्चा आहे.
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने फ्लिपकार्टच्या सेलचं हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरनुसार यंदाचा Big Billion Days सेल 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पोस्टरमध्ये बँक ऑफर्सचीही माहिती दिसत असून Axis आणि ICICI बँकेच्या कार्डवर 10% सूट मिळणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा सेल 9 ऑक्टोबरला सुरू होईल, पण ज्यांच्याकडे Flipkart Plus मेंबरशिप आहे त्यांच्यासाठी एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच सेल ओपन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्लस मेंबर्सना आधी शॉपिंगची संधी मिळणार आहे. चांगल्या फोनचा स्टॉक पटकन संपत असल्याने या आधीच्या ऍक्सेसचा प्लस मेंबर्सना फायदा होतो.
या सेलमध्ये जवळपास सगळ्याच वस्तूंवर सूट मिळणार असली तरी मोबाईल फोनसाठी सगळ्यात जास्त गर्दी असते. Apple, Samsung, Motorola, Poco, Realme यांसारख्या सगळ्या ब्रँडचे फोन खूप कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी iPhone वर 20 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली होती, आणि यंदाही iPhone 16 तसंच iPhone 15 वर मोठी ऑफर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोबाईलशिवाय टीव्ही, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आणि साउंडबार अशा घरगुती वस्तूंवरही 75% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. जुना फोन किंवा टीव्ही देऊन अजून सूट मिळवण्यासाठी एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असेल, तसंच No Cost EMI चा पर्यायही असणार आहे.
मागच्या वर्षी हा सेल 23 सप्टेंबरला सुरू झाला होता, तर Plus आणि Black मेंबर्ससाठी 22 सप्टेंबरपासूनच तो सुरू झाला होता. यंदा दिवाळी उशिरा असल्याने सेलही थोडा उशिरा येत आहे, पण यंदाच्या ऑफर्स मागच्या वर्षीपेक्षा जास्त आकर्षक असतील असं बोललं जात आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात फ्लिपकार्टवर Freedom Sale झाला होता, ज्यात 10% इन्स्टंट डिस्काउंट होता आणि अनेक नवीन फोन लॉन्च झाले होते. Amazon वरही तेव्हा Freedom Sale होता, आणि आता ऑक्टोबरमध्ये Amazon चा Great Indian Festival सेलही येणार आहे. दोन्ही सेल जवळपास एकाच वेळी येत असल्याने ग्राहकांना दोन्ही साइटवरील किमतींची तुलना करून जिथे स्वस्त मिळेल तिथून खरेदी करता येईल. त्यामुळे मोबाईल किंवा कोणतीही मोठी वस्तू घ्यायचा विचार असेल तर 9 ऑक्टोबरपर्यंत थांबणं फायद्याचं ठरू शकतं.