शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:35 IST

धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणपती मूर्ती दिल्लीत विक्रीसाठी

माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने आणि नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पेणच्या गणपती मूर्ती पहिल्यांदाच विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणपती मूर्ती दिल्लीत विक्रीसाठी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सवाची तयारी सगळीकडे जोरात सुरू असताना यंदा पर्यावरणपूरक गणपतीवर जास्त भर दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर पेणच्या प्रसिद्ध आणि पारंपरिक गणपती मूर्तींना यंदा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम माजी राज्यसभा खासदार आणि भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलं आहे.

पेणची गणपती मूर्तिकला ही फक्त पेणची ओळख नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा भाग आहे. ही स्थानिक कला थेट देशपातळीवर पोहोचवण्यासाठी धैर्यशीलदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वात आणि पेणच्या नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील 'महाराष्ट्र एम्पोरियम'मध्ये पेणचे गणपती पहिल्यांदाच विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

धैर्यशील पाटील यांनी स्वतः दिल्लीतील या प्रदर्शन केंद्राला भेट दिली आणि पेणच्या मूर्तिकारांची तसंच कलाकारांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या सक्रिय पाठिंब्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे दिल्लीच्या माध्यमातून ही कला देशभर पोहोचण्याची ऐतिहासिक संधी पेणकरांना मिळाली आहे, आणि ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे.

एका बाजूला धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने दिल्लीत पेणच्या कलेला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळत असताना, दुसरीकडे मुंबईतही पेणच्या मूर्तिकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. ऐनवेळी अस्सल शाडूची मूर्ती शोधणाऱ्या मुंबईकरांसाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून एक उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला आहे. महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रशाली दिगावकर यांच्या प्रयत्नातून कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील 'मराठी महाराष्ट्र एम्पोरियम'मध्ये (शॉप नं. A-30) पेणमधील मूर्तिकार आणि महिला बचत गटांनी बनवलेल्या सुबक शाडू मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शाडूच्या मातीची मूर्ती खूप सुबक असते आणि विसर्जनाच्या वेळी पाण्यात अवघ्या १५ ते २० मिनिटांत विरघळते, त्यामुळे जलप्रदूषण टळतं. यंदा माती, वाहतूक आणि रंगांचे दर वाढल्यामुळे मूर्तींच्या किमती थोड्या वाढल्या असल्या, तरी पीओपी आणि शाडूच्या मूर्तीच्या किमतीत फार मोठा फरक नसल्याने भाविकांच्या खिशावर फार ताण पडत नाही.

गणपती मूर्ती खरेदी करायची असल्यास भाविकांनी ७७६७०५७०५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. धैर्यशील पाटील यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पेणच्या कलेला दिल्लीत मिळालेलं राष्ट्रीय व्यासपीठ आणि मुंबईत इको-फ्रेंडली मूर्तींसाठी मिळालेलं खास दालन, यामुळे यंदाचा गणेशोत्सव पेणच्या मूर्तिकारांसाठी खऱ्या अर्थाने सन्मानाचा ठरला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ