पिठोरी अमावस्येला कोणत्या मुलांकाच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश, वाचा राशीभविष्य
आज गुरुवार असल्याने गुरू ग्रहाचा प्रभाव सगळ्याच मुलांकांवर राहणार आहे. मूलांक १ ते ९ साठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
आज गुरुवार असल्याने आजचा दिवस गुरू ग्रहाला समर्पित मानला जातो. त्यामुळे सगळ्याच मूलांकांच्या लोकांवर गुरू ग्रहाचा प्रभाव दिसणार आहे. मूलांक २ असणाऱ्यांनी कोणताही निर्णय विचार करूनच घ्यावा असं सांगितलं जातंय, तर त्यांची आर्थिक बाजू मात्र चांगली राहील. मूलांक ७ च्या लोकांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. मूलांक १ ते ९ साठी आजचा दिवस नेमका कसा असेल, ते सविस्तर बघूया.
मूलांक १ असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये अपेक्षित यश मिळेल आणि बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं आज मार्गी लागतील. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही दिवस चांगला असेल. घरात आनंदाचं वातावरण राहील आणि जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळेल.
मूलांक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण राहील. पैशांची बाजू मात्र चांगली असेल आणि करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील. घरात आनंदाचं वातावरण राहील, कदाचित एखादा धार्मिक कार्यक्रमही होऊ शकतो. व्यवसाय व्यवस्थित चालेल आणि ऑफिसमधलं वातावरणही सकारात्मक असेल.
मूलांक ३ असणाऱ्यांचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. ऑफिसमध्ये अपेक्षित यश मिळेल आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. मात्र तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. नातेसंबंध चांगले राहतील आणि सामाजिक किंवा धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
मूलांक ४ च्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांचा दिवस साधारण असेल, पण व्यवसायात मात्र अपेक्षित यश मिळेल. पैशांची बाजू भक्कम राहील आणि तब्येतही ठीक राहील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते आणि घरात आनंदाचं वातावरण राहील.
मूलांक ५ असणाऱ्यांचा दिवस साधारण राहील. व्यवसायात नव्या संधी मिळतील आणि प्रवास करणं फायद्याचं ठरेल. रखडलेली कामं वेळेत पूर्ण होतील, पण तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नातेसंबंध चांगले राहतील आणि घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
मूलांक ६ च्या लोकांचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. ऑफिसमध्ये नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. नोकरी-व्यवसायात मात्र अपेक्षित यश मिळेल. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो आणि सामाजिक क्षेत्रातही अपेक्षित यश मिळेल.
मूलांक ७ असणाऱ्यांचा दिवस थोडा प्रतिकूल राहील. तरीही घरात आनंदाचं वातावरण असेल आणि धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होता येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं वेळेत पूर्ण होतील आणि तब्येत चांगली राहील.
मूलांक ८ च्या लोकांचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस साधारण राहील, तर करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. पैशांची बाजू भक्कम राहील, नातेसंबंध चांगले राहतील आणि घरात आनंदाचं वातावरण असेल.
मूलांक ९ असणाऱ्यांसाठी दिवस साधारण राहील. नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांचा दिवस चांगला जाईल. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो आणि पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांसाठी मात्र आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल.
धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई अशा विषयांवरील ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिली जात आहे. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.