शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:35 IST

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; 'तुझे नाव घेता' गाण्यात थिरकताना दिसल्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'मैत्रेया' सिनेमातलं 'तुझे नाव घेता' हे गाणं रिलीज झालं असून उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर यांचा खास डान्स यात पाहायला मिळणार आहे.

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; 'तुझे नाव घेता' गाण्यात थिरकताना दिसल्या
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं असून सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच सुरू झालेल्या याच सणासुदीच्या माहोलात आणखी भर घालणारं 'तुझे नाव घेता' हे बहारदार गणपतीचं गाणं नुकतंच रसिकांसमोर आलं आहे. हे गाणं आगामी 'मैत्रेया' या सिनेमातलं असून सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यात अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या दोघींचा खास डान्स बघायला मिळणार आहे.

'तुझे नाव घेता' हे गाणं सिनेमातील कलाकार समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. गणपती उत्सवाचा जल्लोष, कलाकारांचा उत्साह आणि दमदार बीट्स यामुळे या गाण्याला खास फेस्टिव्ह टच मिळाला आहे.

गाण्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे यात एक खास सरप्राईज आहे. सिनेमाच्या दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघी गाण्यात खास नृत्य करताना दिसणार आहेत. अनेक वर्षांनी या दोघी एकत्र नाचताना दिसणार असल्यामुळे गाण्याची रंगत आणखीनच वाढली आहे.

गुरू ठाकूर यांनी 'तुझे नाव घेता' या गाण्याचे शब्द लिहिले असून पंकज पडघन यांनी याला संगीत दिलं आहे. शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि सणाचा जल्लोष यांचा सुरेख मेळ या गाण्यात साधलेला दिसतो. आकर्षक नृत्य, दमदार संगीत आणि कलाकारांच्या उत्साहामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणात हे गाणं रंग भरणार आहे.

संगीतकार पंकज पडघन यांच्या मते, गाण्यातून गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि उत्सवाचा जल्लोष हे दोन्ही जाणवावेत यासाठी परंपरा सांभाळत आजच्या पिढीलाही आवडेल असा उत्साहपूर्ण साऊंड यात ठेवण्यात आला आहे. क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या नृत्याची झलक हे गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी अपेक्षा आहे.

समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित 'मैत्रेया' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे सिनेमाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. सिनेमात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'तुझे नाव घेता' या गणपती गीतामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. गणपती बाप्पाचं आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे भक्तीमय आणि उत्साहपूर्ण गाणं प्रेक्षकांसमोर आलं आहे. 'मैत्रेया' हा सिनेमा येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ