गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

कोलकाता मेट्रोत महिलांचा राडा! ऑन-ड्युटी आरपीएफ कर्मचाऱ्याला थेट भिडल्या; व्हिडिओ तुफान व्हायरल

कोलकात्याच्या नेताजी भवन मेट्रो स्टेशनवर दोन महिला प्रवाशांनी ड्युटीवरील आरपीएफ महिला अधिकाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोलकाता मेट्रोत महिलांचा राडा! ऑन-ड्युटी आरपीएफ कर्मचाऱ्याला थेट भिडल्या; व्हिडिओ तुफान व्हायरल
एआयने तयार केलेले प्रातिनिधिक चित्र; हे प्रत्यक्ष घटनेचे छायाचित्र नाही | PT24

कोलकात्यातील नेताजी भवन मेट्रो स्टेशनवर सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. दोन महिला प्रवाशांनी स्टेशनवर ड्युटीवर असलेल्या आरपीएफ महिला अधिकाऱ्यासोबत थेट हाणामारी सुरू केली. ही घटना ब्लू लाईनवरील भवानीपूर परिसरातील नेताजी भवन स्टेशनवर रात्री साधारण १० वाजताच्या सुमारास घडली. या भागातून रोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात आणि नेमक्या याच वेळी स्टेशनवर हा राडा झाला.

मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिलांनी कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय आरपीएफ महिला जवानासोबत वाद घालायला सुरुवात केली. काही वेळातच हा वाद इतका टोकाला गेला की महिलांनी अधिकाऱ्याचे केस पकडून तिला जमिनीवर लोळवत मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार इतका भयंकर होता की आजूबाजूला उभे असलेले प्रवासी देखील हे दृश्य पाहून चक्रावले आणि काहींना काय करावे तेच सुचेना.

काही प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकार आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. या व्हिडिओत दोन्ही महिला आरपीएफ अधिकाऱ्यावर हल्ला करताना आणि तिला मारताना स्पष्टपणे दिसतात. वाद इतका वाढला की अखेर इतर आरपीएफ कर्मचारी आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांना मध्यस्थी करावी लागली. व्हिडिओच्या शेवटच्या भागात लोक दोन्ही महिलांना आरपीएफ अधिकाऱ्यापासून वेगळे करताना दिसतात, तेव्हा कुठे हा प्रकार थांबला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला दोन्ही महिलांनी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलांची समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी ऐकण्यास नकार दिल्याने अखेर दोघींवर प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.

ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांकडून महिलांच्या या वर्तनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ @contentkikamii या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "एवढा राग आला तरी सार्वजनिक ठिकाणी अशी मारामारी योग्य नाही." दुसऱ्या एका यूजरने विचारले, "पण नक्की घडलं काय?" तर आणखी एका यूजरने टिप्पणी केली, "रेल्वे स्टेशन म्हणजे कुस्तीचा नवा आखाडा झालाय."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ