गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:48 IST

ब्रिटनमधील कर बदलांमुळे अब्जाधीशांची ग्रीसकडे वाट, नॉन-डॉम योजनेचा आधार

ब्रिटनमधील अनेक बडे अब्जाधीश आता ग्रीसमध्ये स्थायिक होत आहेत. ग्रीसची कर सवलत आणि तिथली जीवनशैली यामागचं कारण आहे.

ब्रिटनमधील कर बदलांमुळे अब्जाधीशांची ग्रीसकडे वाट, नॉन-डॉम योजनेचा आधार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जगभरातल्या सुपर श्रीमंत लोकांच्या स्थलांतराचा एक नवा ट्रेंड सध्या दिसतो आहे. ब्रिटन, अमेरिका आणि युरोपमधले अनेक मोठे अब्जाधीश आता आपला मूळ देश सोडून ग्रीससारख्या निसर्गरम्य आणि टॅक्स-फ्रेंडली देशात जाऊन राहायला लागले आहेत. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ब्रिटनमधले प्रसिद्ध अब्जाधीश आणि रोकोस कॅपिटल मॅनेजमेंट या कंपनीचे संस्थापक ख्रिस रोकोस. त्यांनी लंडन सोडून थेट ग्रीसच्या अथेन्समध्ये आपलं टॅक्स रेसिडेन्सी शिफ्ट केलं आहे, आणि याच निर्णयामुळे या विषयावर जगभर चर्चा सुरू झाली आहे.

रोकोस यांनी एकट्याने गेल्या वर्षी ब्रिटन सरकारला ३३० दशलक्ष पाउंड्स इतका कर भरला होता, म्हणजे साधारण ४,२३५ कोटी रुपये. इतका मोठा टॅक्सपेयर देश सोडून गेल्यामुळे युरोपच्या अर्थकारणात खळबळ उडाली आहे.

हेनले अँड पार्टनर्स या संपत्ती आणि स्थलांतरावर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, एकट्या २०२५-२०२६ या काळात साधारण १,२०० हून जास्त लक्षाधीश ग्रीसमध्ये स्थायिक होतील असा अंदाज आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ग्रीसची नॉन-डॉमिसाईल टॅक्स रेसिडेन्सी योजना. या योजनेखाली, परदेशातून करोडोंचा नफा कमावणाऱ्या श्रीमंत लोकांना ग्रीसमध्ये राहून त्यांच्या परदेशी उत्पन्नावर फक्त १,००,००० युरो इतकाच वार्षिक फ्लॅट टॅक्स भरावा लागतो, म्हणजे जवळपास ९५ लाख रुपये. हा फायदा सलग १५ वर्षांपर्यंत मिळतो. अब्जाधीशांना त्यांच्या मूळ देशातल्या टॅक्सच्या तुलनेत ही रक्कम अगदी किरकोळ वाटते, त्यामुळे ग्रीस त्यांचं आवडतं ठिकाण बनत चाललं आहे.

ब्रिटनमधल्या कर रचनेत झालेले मोठे बदल हे या स्थलांतरामागचं मुख्य कारण मानलं जातं. ब्रिटन सरकारने अनेक दशकं जुनी नॉन-डॉम स्टेटस सवलत रद्द केली आहे, ज्यामुळे परदेशी नागरिकांना ब्रिटनमध्ये राहून परदेशी उत्पन्नावर टॅक्स सवलत मिळायची. याशिवाय कॅपिटल गेन्स, इनहेरिटन्स टॅक्स आणि प्रायव्हेट इक्विटीवरचा वाढलेला टॅक्स यामुळे ख्रिस रोकोस यांच्यासोबतच लक्ष्मी मित्तल आणि नसिफ साविरिस यांच्यासारख्या मोठ्या उद्योजकांनीही ब्रिटन सोडून दुसऱ्या देशांची वाट धरली आहे.

दुसरीकडे ग्रीस सरकारने फक्त टॅक्स सवलतच दिली नाही, तर फायनान्शियल कंपन्या, हेज फंड आणि प्रायव्हेट इक्विटी मॅनेजरसाठी कॅरिड इंटरेस्ट आणि बोनसवर फक्त ५% टॅक्स लावण्याचा नवीन नियम आणला आहे. यामुळे रोकोस यांच्यासारखे उद्योजक अथेन्समध्ये स्वतःची नवी कॉर्पोरेट ऑफिस सुरू करत आहेत, आणि यामुळे तिथल्या रोजगारालाही चालना मिळते आहे.

फक्त टॅक्समधल्या फायद्यांमुळेच नाही, तर ग्रीसमधलं निसर्ग सौंदर्य आणि तिथली लाइफस्टाइलही श्रीमंतांना आकर्षित करते आहे. भूमध्य समुद्राचा सुंदर किनारा, वर्षभर मिळणारं छान ऊन, प्रदूषणमुक्त वातावरण आणि शांत युरोपियन लाइफस्टाइल यामुळे लंडन किंवा न्यूयॉर्कसारख्या गजबजलेल्या शहरांना कंटाळलेले श्रीमंत लोक ग्रीसला पसंती देत आहेत.

याशिवाय ग्रीसचा गोल्डन व्हिसा प्रोग्राम परदेशी गुंतवणूकदारांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून सहज नागरिकत्व आणि रहिवासी दर्जा मिळवून देतो. आधी ग्रीसची ओळख फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध देश अशी होती, पण आता ग्रीस सरकार स्वतःला जागतिक गुंतवणूक, हेज फंड आणि बिझनेस हब म्हणून पुढे आणतं आहे. त्यामुळे आता श्रीमंत लोक फक्त पैसे कुठे कमवायचे याचा विचार करत नाहीत, तर शांततेत आयुष्य जगण्यासाठी आणि आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रीसचा पर्याय निवडत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ