गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

Zomato चा ग्राहकांना मोठा झटका! Cash On Delivery वर आता लागणार Extra Charge; जाणून घ्या नियम

झोमॅटोने कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरवर वेगळं शुल्क लावायला सुरुवात केलीय, तर स्विगी अजून असं कोणतंही शुल्क आकारत नाहीये.

Zomato चा ग्राहकांना मोठा झटका! Cash On Delivery वर आता लागणार Extra Charge; जाणून घ्या नियम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महागाईचा फटका आता जवळपास प्रत्येक क्षेत्राला बसतोय आणि रोजच्या वापरातल्या गोष्टींचे भाव सतत वाढत चाललेत. याच रांगेत आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोचंही नाव जोडलं गेलंय. कंपनीने आपल्या कोट्यवधी युजर्सना एक मोठा धक्का दिलाय. डिजिटल पेमेंटला चालना द्यायची आणि ऑपरेशनल खर्च आटोक्यात ठेवायचा, या दोन कारणांसाठी झोमॅटोने कॅश ऑन डिलिव्हरी (COD) पर्यायावर आता वेगळं शुल्क लावायला सुरुवात केलीय.

हे नवीन शुल्क प्रत्येक युजरनुसार आणि ऑर्डरच्या किमतीनुसार वेगवेगळं असण्याची शक्यता आहे. शनिवारी कंपनीच्या ॲपवर ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली. ऑर्डरच्या बिलावर हे शुल्क "पे ऑन डिलिव्हरी फी" असं दाखवलं जातंय आणि जेव्हा ग्राहक डिलिव्हरीच्या वेळी रोख पैसे देण्याचा पर्याय निवडतात, तेव्हाच हे शुल्क लागू होतं. ही रक्कम सगळ्यांसाठी सारखी नसणार. वेगवेगळ्या किमतीच्या ऑर्डरसाठी वेगवेगळं शुल्क दाखवलं जातंय, म्हणजे कमी किमतीच्या आणि जास्त किमतीच्या ऑर्डरवर हे शुल्क वेगवेगळं दिसू शकतं.

हे शुल्क नेमकं कशाच्या आधारावर ठरवलं जातंय, म्हणजे ऑर्डरची किंमत, ग्राहकाचं ठिकाण की आणखी काही वेगळे घटक, याचा नेमका आधार अजून समोर आलेला नाही. कंपनीने याबाबत सविस्तर आणि ठोस माहिती अजून दिलेली नाही, त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक वेळी ऑर्डर दिल्यावर हे शुल्क किती लागतंय, हे बिलावरच पाहावं लागेल.

दुसरीकडे झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी सध्या कॅश-ऑन-डिलिव्हरी ऑर्डरवर असं कोणतंही जादा शुल्क लावत नाहीये. दोन्ही कंपन्यांच्या धोरणातला हा फरक ग्राहकांच्या नजरेत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे झोमॅटोच्या या निर्णयाचा ग्राहकांवर नेमका काय परिणाम होतो, हे पुढच्या काळात दिसून येईल.

फूड डिलिव्हरी कंपन्या सध्या नवनवीन शुल्क रचना आणि कमाईच्या नव्या पद्धतींवर प्रयोग करत असतानाच झोमॅटोने हे पाऊल उचललंय. झोमॅटो आधीपासूनच फूड ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारतं. त्याशिवाय डिलिव्हरी, पॅकेजिंग आणि इतर लागू असलेली शुल्कंही ग्राहकांकडून घेतली जातात. आता या यादीत कॅश ऑन डिलिव्हरीच्या नव्या शुल्काचीही भर पडलीय. याचा थेट परिणाम म्हणून तुम्ही मागवत असलेल्या जेवणाचा एकूण खर्च आपोआप वाढणार आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी ऑनलाइन जेवण मागवताना, कॅश ऑन डिलिव्हरी निवडणार असाल तर बिलावर हे वेगळं शुल्क दिसतंय का, हे तपासूनच ऑर्डर द्या आणि एकूण किती रक्कम भरावी लागणार आहे, याची खात्री करूनच ऑर्डर पूर्ण करा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ