गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

मिश्रित इंधनामुळे इंजिन बिघडलं तरी क्लेम मिळणार; झुनोचं नवं फ्युएल गार्ड कव्हर

कार विमा कंपनी झुनो जनरल इन्शुरन्सने फ्युएल गार्ड नावाचं नवं ॲड-ऑन कव्हर आणलं असून मिश्रित इंधनामुळे इंजिनाचं नुकसान झालं तर त्याचंही संरक्षण मिळणार आहे.

मिश्रित इंधनामुळे इंजिन बिघडलं तरी क्लेम मिळणार; झुनोचं नवं फ्युएल गार्ड कव्हर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कार चालवणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. झुनो जनरल इन्शुरन्स या डिजिटल विमा कंपनीने फ्युएल गार्ड नावाचं एक नवीन ॲड-ऑन कव्हर लाँच केलं आहे. विमा प्रक्रिया सोपी, सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यावर भर देणाऱ्या या कंपनीने उद्योगात पहिल्यांदाच असं कार विमा ॲड-ऑन बाजारात आणलं आहे.

भारतात मिश्रित इंधनांचा म्हणजेच ब्लेंडेड फ्युएल्सचा वापर हळूहळू वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गाडी मालकांना एक जास्तीचं संरक्षण कवच मिळावं, या उद्देशाने कंपनीने हे ॲड-ऑन तयार केलं आहे.

मिश्रित इंधनाचा वापर जसजसा वाढतो आहे, तशी वाहनांमधील तंत्रज्ञानही बदलत आहे. गाडी बनवणाऱ्या कंपनीने मंजूर केलेलं मिश्रित इंधन वापरताना अपघाती किंवा अनपेक्षित नुकसान झालं, तर इंजिन आणि इंधन यंत्रणेतील ठराविक भागांना जास्तीचं संरक्षण मिळावं, यासाठीच फ्युएल गार्ड डिझाइन केलं गेलं आहे. यामुळे गाडी मालकांना जास्त निर्धास्त राहता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

मात्र हे कव्हर घ्यायचं असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागतील. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर नोंदणी झालेल्या खाजगी वाहनांनाच हे कव्हर लागू होणार आहे. त्यातही, गाडी बनवणाऱ्या कंपनीने त्या विशिष्ट मिश्रित इंधनाला मंजुरी दिलेली असणं गरजेचं आहे. शिवाय गाडीचं मेंटेनन्स शेड्युल उत्पादकाने सांगितलेल्या नियमांनुसारच झालेलं असावं आणि इंजिन किंवा इंधन यंत्रणेत कुठलाही अनधिकृत बदल केलेला नसावा, अशी अट आहे.

हे फ्युएल गार्ड कव्हर खाजगी वाहनांच्या पॅकेज पॉलिसी, स्टँड-अलोन ओन डॅमेज पॉलिसी आणि बंडल पॉलिसीसोबतही निवडता येणार आहे. यात ३ वर्षांच्या दीर्घकालीन पॉलिसींचाही समावेश आहे.

झुनो जनरल इन्शुरन्सच्या एमडी आणि सीईओ शनाई घोष यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, फ्युएल गार्ड ही संकल्पना एका सोप्या विचारातून तयार झाली आहे. मोबिलिटी परिसंस्था बदलत असताना विमा संरक्षणातही तसाच बदल व्हायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. मोबिलिटीमधले बदल ग्राहकांच्या अपेक्षा आणि गाडी वापरण्याच्या अनुभवाला कसा आकार देत आहेत, यावर कंपनी सातत्याने संशोधन करत असते. फ्युएल गार्ड हे त्या संशोधनाचं रूपांतर सोप्या आणि व्यावहारिक उपायात करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे, ज्यामुळे रोजच्या आयुष्यात विमा संरक्षण जास्त उपयुक्त ठरेल, असं त्या म्हणाल्या.

या फ्युएल गार्ड कव्हरमुळे झुनो कंपनी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून मोटर विमा देण्याच्या आपल्या भूमिकेवर अधिक ठाम उभी राहते आहे. पारंपरिक जोखमींपलीकडे जाऊन गाडी मालकीच्या काही विशिष्ट गरजा भागवणारे सोल्यूशन्स यामुळे उपलब्ध होणार आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ