गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

जपानी जीवनशैलीतील सहा साध्या सवयींमुळे मिळू शकते शांत आणि निवांत आयुष्य

रोजची धावपळ आणि ताणतणाव कमी करण्यासाठी जपानी संस्कृतीतल्या काही शिस्तबद्ध सवयी उपयोगी ठरू शकतात.

जपानी जीवनशैलीतील सहा साध्या सवयींमुळे मिळू शकते शांत आणि निवांत आयुष्य छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रोजची धावपळ, ऑफिसचं काम आणि सतत बदलणारी जीवनशैली यामुळे आजकाल अनेकांना स्वतःसाठी वेळ काढणंच अवघड होऊन बसलंय. सतत ताण, कमी झोप, व्यायामाची कमतरता आणि दिनचर्या बिघडल्यामुळे मनाची शांतीही ढासळू शकते. अशा वेळी जपानच्या रोजच्या जगण्यातल्या काही छोट्या पण शिस्तबद्ध सवयी आपल्यालाही उपयोगी पडू शकतात, असं सांगितलं जातं.

यातली पहिली सवय म्हणजे घर आणि आजूबाजूचा परिसर नीटनेटका ठेवणं. जपानी संस्कृतीत स्वच्छता ही फक्त घरकाम समजली जात नाही, तर ती एक शिस्त मानली जाते. रोज काही मिनिटं वस्तू जागच्या जागी ठेवणं, नको असलेलं सामान बाजूला काढणं आणि घर स्वच्छ ठेवणं यामुळे वातावरण अधिक टापटीप राहतं.

दुसरी सवय म्हणजे दिवसाची सुरुवात शांतपणे करणे. जपानी जीवनशैलीत सकाळी लवकर उठण्याला महत्त्व दिलं जातं. उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेण्याऐवजी किंवा कामाच्या घाईत अडकण्याऐवजी स्वतःसाठी थोडा वेळ काढता येतो. हलका व्यायाम, ध्यान, चहा-कॉफी शांतपणे घेणं किंवा दिवसाचं नियोजन करणं अशा छोट्या गोष्टींमुळे सकाळची घाई कमी होण्यास मदत होऊ शकते.

तिसरी सवय जपानी भाषेतल्या 'मौताइनाई' या संकल्पनेतून येते. ही संकल्पना उगीच वस्तूंचा अपव्यय टाळण्यावर भर देते. एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकून न देता ती दुरुस्त करून पुन्हा वापरता येईल का, याचा विचार करण्याची ही सवय आहे. कपडे, फर्निचर किंवा घरातल्या इतर वस्तूंचा योग्य वापर आणि पुनर्वापर केल्यास कचरा कमी होण्यास मदत होते.

चौथी सवय म्हणजे निसर्गाशी जोडून घेणे. यासाठी 'शुन' ही जपानी संकल्पना सांगितली जाते, जी योग्य हंगामातल्या गोष्टींचा आनंद घेण्यावर भर देते. मोसमी फळं-भाज्या खाणं, ऋतू बदलताना होणारे बदल अनुभवणं आणि निसर्गाकडे थोडं लक्ष देणं याचा यात समावेश होतो. दिवसभराच्या घाईतून थोडा वेळ निसर्गासाठी काढल्यास मनाला विरंगुळा मिळू शकतो.

पाचवी सवय म्हणजे आंघोळीचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे. दिवसभराच्या धावपळीनंतर काही वेळ शांतपणे आराम करणं गरजेचं असतं. जपानी संस्कृतीत कोमट पाण्यात काही वेळ आराम करण्याची पद्धत आहे. आंघोळ करताना काही मिनिटं मोबाईल आणि इतर गोष्टींपासून दूर राहून स्वतःला वेळ देता येतो.

सहावी आणि शेवटची सवय म्हणजे अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. जपानमध्ये जेवण सुरू करण्याआधी 'इतादाकिमासु' म्हणण्याची परंपरा आहे. यामागे अन्न आणि ते तयार करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. आपणही जेवताना क्षणभर थांबून अन्नाबद्दल आभार मानण्याची सवय अंगी बाणवू शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ