गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:23 IST

यंदा गणपती बाप्पा 12 दिवस राहणार, तिथीच्या गणितामुळे उत्सव लांबणार

14 सप्टेंबरला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने आणि तिथीच्या वाढीमुळे यंदाचा गणेशोत्सव 10 किंवा 11 नाही तर तब्बल 12 दिवसांचा असणार आहे.

यंदा गणपती बाप्पा 12 दिवस राहणार, तिथीच्या गणितामुळे उत्सव लांबणार
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

यंदाचा गणेशोत्सव नेहमीसारखा 10 किंवा 11 दिवसांचा न राहता यावेळी थेट 12 दिवस चालणार आहे. 14 सप्टेंबर रोजी बाप्पाचं आगमन होणार असून, हरतालिका आणि गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी आल्यामुळे तसंच तिथीच्या वाढीमुळे हा बदल झाला आहे.

या 12 दिवसांच्या उत्सवावरून सोशल मीडियावर सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, काही जण याला दुर्मिळ योग समजत आहेत. मात्र हा कुठलाही अद्भुत किंवा दुर्मिळ योग नसून, केवळ तिथीच्या गणितामुळे घडलेला हा बदल आहे, असं पंचांगकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्याने त्याच दिवशी उत्सवाला सुरुवात होत आहे, आणि त्यामुळेच उत्सवाचा कालावधी वाढला आहे.

हिंदू धर्मातील सगळे सण तिथीनुसार साजरे केले जातात. कधी तिथीचा क्षय होतो तर कधी तिथीची वाढ होते. यंदा गणेश चतुर्थी तृतीयेच्या दिवशी येत असल्याने, तृतीयेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मोजलं तर तब्बल 12 दिवस होतात. म्हणूनच यंदाचा उत्सव 12 दिवसांचा असणार आहे.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तर सार्वजनिक गणपतीचं विसर्जन अनंत चतुर्दशीला होतं. चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंतच्या याच तिथी असतात, कारण सगळे सण तारखेवर नाही तर तिथीवर अवलंबून असतात. त्यामुळे चतुर्थी ते चतुर्दशी या तिथींचा समूह साधारण 11 तिथींचा होतो. कधी किंचित वाढ होते तर कधी तिथीचा क्षय होतो, त्यामुळेच कधी गणपती 10 दिवसांचे तर कधी 11 दिवसांचे असतात.

यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी, म्हणजेच हरतालिकेच्याच दिवशी बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे यंदा तृतीयेपासूनच मोजणी करावी लागते. तृतीया ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस मोजले तर 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असे तब्बल 12 दिवस होतात. त्यामुळे हा 12 दिवसांचा काही दुर्मिळ योग नाही.

सोशल मीडियावर हा योग अनेक वर्षांनंतर आल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात तसं काहीही नाही, हा केवळ एक गैरसमज आहे. तिथीची वाढ आणि क्षय यामागचं जे लॉजिक असतं, त्यानुसारच दिवसांमध्ये कमी-जास्त होत असतं. त्यामुळे यंदाचा हा 12 दिवसांचा गणेशोत्सव कुठलाही विशेष दुर्मिळ योग नाही, असं पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ