ग्रीक बुद्धिबळपटू स्टावरोउला त्सोलाकिडू हिला 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार, जावा बॉबर मोटरसायकल जिंकली
ग्लोबल चेस लीग 2026 च्या चौथ्या हंगामात ग्रीक बुद्धिबळपटू स्टावरोउला त्सोलाकिडू हिने 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' हा किताब पटकावला आणि त्यासोबत जावा ऑल स्टार्स 42 बॉबर - सिल्व्हर नाईट ही मोटरसायकल बक्षीस म्हणून मिळवली. स्टावरोउला ही FIDE ची आंतरराष्ट्रीय मास्टर आणि वूमन ग्रँडमास्टर आहे.
गँगेस ग्रँडमास्टर्स संघाकडून खेळताना स्टावरोउलाने महत्त्वाची भूमिका बजावली आणि तिच्या संघाला या स्पर्धेतलं पहिलं ग्लोबल चेस लीग विजेतेपद मिळवून दिलं. स्पर्धेत सगळ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी ती एक ठरली.
स्टावरोउलाचा प्रवास हा साधासरळ नव्हता. सुरुवातीला तिला अपयश आलं, पण तिथून तिने पुनरागमन करत स्पर्धेत स्वतःचं स्थान परत मिळवलं. याच उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला 'ग्रीक गॉडेस' असं टोपणनावही मिळालं आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरून सर्वोच्च वैयक्तिक सन्मानापर्यंत पोहोचण्याचा तिचा हा प्रवास चिकाटी आणि संघाशी प्रामाणिक राहण्याचं उदाहरण मानला जातो आहे.
क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी स्टावरोउलाच्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितलं, "स्टावरोउलाचा प्रवास उठून दिसला कारण तो फक्त जिंकण्यापेक्षा खूप जास्त होता. तिने सुरुवातीच्या अपयशाचा सामना केला, पुढे जात राहण्याचं धैर्य दाखवलं आणि चिकाटी तसंच जिद्दीच्या जोरावर आपलं स्थान मिळवलं. मला समान रीतीने प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे तिने हे यश तिच्या संघासोबत शेयर केलं आणि हे ओळखलं की वैयक्तिक यश हे अनेकदा सामूहिक पाठिंब्यावरच उभं असतं. व्यक्तिमत्त्व, वैयक्तिक वैशिष्ट्य आणि संघभावनेचा हाच समतोल ऑल स्टार्स अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे. सिल्व्हर नाईट बॉबर हा तोच उत्साह साजरा करण्याचा आणि ही भावना खऱ्या अर्थाने जगणाऱ्या खेळाडूचा गौरव करण्याचा आमचा एक मार्ग आहे."
जावा ऑल स्टार्स 42 बॉबर - सिल्व्हर नाईट या मोटरसायकलचं अनावरण महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या हस्ते बंगळुरूमध्ये ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात करण्यात आलं. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या आणि सोबतच्या लोकांनाही पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना आदरांजली म्हणून ही मोटरसायकल तयार करण्यात आली आहे. स्टावरोउलाच्या रूपाने या मोटरसायकलला एक योग्य पहिली विजेती मिळाली असं मानलं जात आहे, कारण तिचा या स्पर्धेतील प्रवास ऑल स्टार्स अध्यायाच्या भावनेला अगदी योग्य प्रकारे दर्शवतो.
जावा ऑल स्टार्स 42 बॉबर - सिल्व्हर नाईटची पहिली विजेती म्हणून स्टावरोउला चिकाटी, धैर्य आणि आव्हानातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडण्याची क्षमता यांचं प्रतिनिधित्व करते. स्वतःच्या चालीवर विश्वास ठेवणारी, स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणारी आणि वाटेत इतरांनाही सोबत घेऊन जाणारी खेळाडू म्हणजे ऑल स्टार असण्याचा खरा अर्थ आहे, असं तिच्या कामगिरीतून दिसून येतं.