शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:39 IST

गोकुळ दूध संघ निवडणुकीत सोशल मीडियावरून नेत्यांवर आरोपांची राळ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावर पोहोचला असून महायुतीतील गटबाजी आणि महायुती-महाविकास आघाडी यांच्यातील शाब्दिक वाद चव्हाट्यावर आला आहे.

गोकुळ दूध संघ निवडणुकीत सोशल मीडियावरून नेत्यांवर आरोपांची राळ
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार यंदा सभांपुरता मर्यादित न राहता थेट सोशल मीडियावर पोहोचला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत गटबाजी आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील शाब्दिक चढाओढ यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यावेळच्या प्रचारात सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप थेट टोकाच्या पातळीवर पोहोचल्याचे दिसत आहे.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गोकुळ दूध संघातील दोन प्रमुख नेत्यांच्या कथित गैरकारभाराचे तपशील उघड करणारी मालिका व्हायरल करण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या काही दशकांतील राजकीय घडामोडींवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. तब्बल ३५ वर्षे एकत्र राहून कारभार केलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत बंड करून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत हातमिळवणी केलेल्या नेत्यांच्या राजकीय प्रवासावर बोचरी टीका केली जात आहे.

राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे गट या दोन प्रमुख नेत्यांनाच लक्ष्य करत असून त्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. गोकुळमधील कथित गैरव्यवहार, निर्णय आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर आधारित व्हिडिओ, मेसेज आणि पोस्टची मालिकाच सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. गोकुळ निवडणुकीचा प्रचार यंदा केवळ सभांपुरता मर्यादित न राहता एकमेकांचे कच्चे चिठ्ठे बाहेर काढण्यापर्यंत पोहोचला असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी जे मुद्दे उघडपणे मांडता येत नव्हते, ते मुद्दे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येऊ लागले आहेत. सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत ठराव करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक गटाला ठराव करणाऱ्यांची गरज असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय कुरघोडी सुरू असल्याचे दिसत आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. या पोस्ट आणि व्हिडिओंमधून संबंधित नेत्यांच्या राजकीय वाटचालीसह गोकुळमधील कारभारावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे गोकुळमधील गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या ३५ वर्षांतील गोकुळमधील घडामोडी दूध उत्पादकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत ज्या संचालकांनी काही नेत्यांना साथ दिली, त्यांच्यावरही आता उघडपणे टीका न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केले जात असल्याचे दिसून येत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ