गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:05 IST

२६ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात आढळलं 'गर्भाशय'! मूल होत नाही म्हणून तपासणी करायला गेलेल्या दिल्लीतील तरुणाची

दिल्लीतील एका 26 वर्षांच्या विवाहित तरुणाच्या वंध्यत्व तपासणीत गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारख्या रचना आढळल्याने अत्यंत दुर्मीळ अशी PMDS ही स्थिती समोर आली.

२६ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात आढळलं 'गर्भाशय'! मूल होत नाही म्हणून तपासणी करायला गेलेल्या दिल्लीतील तरुणाची छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिल्लीत एक अत्यंत विचित्र आणि दुर्मीळ मेडिकल केस समोर आली आहे. लग्नाला जवळपास दोन वर्षे झालेलं एक जोडपं कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न करत होतं, पण मूल होत नव्हतं. त्यामुळे दोघांनीही डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली. सुरुवातीला पत्नीच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि त्या सामान्य आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी नवऱ्याची प्रजननक्षमता म्हणजेच फर्टिलिटी तपासायला सुरुवात केली आणि तिथूनच या केसने वेगळंच आणि अनपेक्षित वळण घेतलं.

तपासणीत सगळ्यात आधी लक्षात आलं की या 26 वर्षांच्या तरुणाच्या शरीरात दोन्ही वृषण त्यांच्या नेहमीच्या जागी नव्हते, म्हणजे ते खाली उतरलेले नव्हते. त्यानंतर वीर्य तपासणी केली असता त्यात अजिबात शुक्राणू आढळले नाहीत, म्हणजेच त्याला अॅझूस्पर्मिया ही स्थिती होती. गंमत म्हणजे त्याच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी अगदी सामान्य होती, पण FSH आणि LH या हार्मोन्सचं प्रमाण मात्र वाढलेलं दिसलं. या तपासण्यांमुळे डॉक्टरांना पुढे अधिक खोलात जाऊन तपास करण्याची गरज वाटली.

या सगळ्या चाचण्यांनंतर डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केला, ज्यात पोटाच्या खालच्या भागात काहीतरी असामान्य रचना दिसून आली. नेमकं काय आहे हे स्पष्ट व्हावं यासाठी मग MRI करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच MRI रिपोर्टने या केसमागचं गूढ पूर्णपणे उलगडलं.

MRI मध्ये या तरुणाच्या पोटात गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारख्या रचना विकसित झालेल्या दिसल्या. यानंतर त्याचा गुणसूत्र नमुना तपासला असता तो 46,XY निघाला, म्हणजे तो जनुकीयदृष्ट्या पुरुषच होता. या सगळ्या तपासण्यांच्या आधारे डॉक्टरांनी निदान केलं की या तरुणाला Persistent Müllerian Duct Syndrome म्हणजेच PMDS हा जन्मजात आणि अत्यंत दुर्मीळ आजार आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की PMDS मध्ये पुरुष भ्रूणाच्या वाढीदरम्यान Anti-Müllerian Hormone म्हणजेच AMH किंवा त्याच्या रिसेप्टरमध्ये काही बिघाड झाला, तर गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारख्या रचना शरीरातून पूर्णपणे नाहीशा न होता तशाच टिकून राहू शकतात. या तरुणाच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं होतं, आणि त्यामुळेच त्याच्या शरीरात या रचना विकसित झालेल्या आढळल्या.

यावर उपाय म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेत काढलेल्या ऊतकांची तपासणी केली असता त्याच्या एका वृषणात कर्करोगपूर्व बदल झाल्याचंही समोर आलं. त्यामुळे अशा प्रकारच्या रचनात्मक समस्या लहानपणापासूनच वेळीच ओळखून त्यांचं निदान करणं किती गरजेचं आहे, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ