चंद्रपूरच्या लेकींसाठी धावून आले लॉयन्स क्लब
चंद्रपुरात मुलींच्या आरोग्यासाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. महिला आणि मुलींमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हाइकल कॅन्सर हा आजार वेगाने वाढत असल्यामुळे याबद्दल व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने चंद्रपुरातील ८ लॉयन्स क्लबनी एकत्र येऊन ही मोहीम आखली आणि राबवली.
या मोहिमेअंतर्गत ३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरातील १५ शाळा आणि कॉलेजांमध्ये खास जनजागृती शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना ३,५०० हून अधिक विद्यार्थिनी हजर होत्या. या शिबिरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थिनींना सर्व्हाइकल कॅन्सर का होतो, त्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे कोणती, तो टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतात आणि वेळेत तपासणी करून घेण्याचे महत्त्व काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
फक्त जनजागृतीवर न थांबता या मंडळींनी प्रत्यक्ष कृतीही केली. ९ सप्टेंबर रोजी ६०५ विद्यार्थिनींना एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी ही लस अतिशय परिणामकारक मानली जाते, आणि म्हणूनच या मोहिमेत ती विद्यार्थिनींना मोफत टोचण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेसाठी लॉयन्स क्लब नागपूर समर्पणचे सीए अमित चांडक आणि स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनच्या डॉ. दीपिका चंडोक यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. त्यांच्या सहभागामुळेच ही मोहीम शास्त्रोक्त पद्धतीने राबवता आली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रपुरातील सर्व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी मेहनत घेतली. यामध्ये पीडीजी डॉ. विलास मुळे, पीडीजी शैलेश बागला, पीएसटी कोऑर्डिनेटर अनुराधा बागला, झोन चेअरपर्सन अजय वैरागडे, विवेक भास्करवार, पुरुषोत्तम वंजारी, मनीष भंडारी, सोनिया गुप्ता, विकास घटे, कुश बागला, अशोक बंग, कविता अग्रवाल, श्रेयांश गुप्ता, सुनीता जैन, डॉ. आरती जोशी, डॉ. अरुण कुलकर्णी, ॲड. विजया बांगडे, डॉ. अपर्णा सोनवलकर, डॉ. नीलिमा मुळे, डॉ. संध्या कुलकर्णी, पल्लवी भास्करवार, डॉ. कीर्ती साने, श्याम धोपटे, अंजू गोयल, राज पुगलिया, स्मिता जीवतोडे, अभिषेक बागला, प्रियंका वंजारी, कविता टहिल्यानी, लक्ष्मी अग्रवाल, उमा जैन, शकुंतला अग्रवाल, मीनाक्षी जोगी, भारती कुरेकर, सरिता घटे आणि खुशबू बागला यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली. या मोहिमेच्या यशाचे संपूर्ण श्रेय पीएसटी कोऑर्डिनेटर अनुराधा बागला यांना दिले जात आहे.
या सामाजिक उपक्रमाला चंद्रपुरातील विविध शाळा-कॉलेजांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. मुलींच्या आरोग्यासाठी लॉयन्स क्लबने दाखवलेल्या या बांधिलकीचे आणि राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.