गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क

वयस्कर महिलेने पोल वॉल्टमध्ये घेतलेली उंच उडी सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव.

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वय वाढलं की हाडं कमकुवत होतात आणि शरीराची हालचाल पूर्वीसारखी राहत नाही, असं आपण नेहमी ऐकतो. आजकाल तर तरुणपणीच अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो, त्यामुळे वयस्कर लोकांनी शरीराची जास्त हालचाल न करणं हे सहाजिकच मानलं जातं. पण मनात जिद्द असेल तर वयाचा आकडा काहीच ठरवत नाही, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओत एक वयस्कर महिला सांधेदुखीचा त्रास असूनही बेडवर पडून राहण्याऐवजी थेट पोल वॉल्टमध्ये उतरलेली दिसते. हा प्रकार पाहून तरुणांचीही हवा टाईट झाल्याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

व्हिडिओ अमेरिकेतील एका हायस्कूलच्या ट्रॅक मीटमधला आहे. या ट्रॅक मीटमध्ये सगळे खेळाडू आपापल्या स्पर्धेसाठी तयारी करत होते आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं. याच स्पर्धेत एक वयस्कर खेळाडू सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. हातात खांब घेऊन, मान थोडी झुकलेली आणि पावलं हळूहळू टाकत ती महिला स्पर्धेसाठी सज्ज होते. तिने अमेरिकेच्या झेंड्याचा टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शॉर्ट्स घातलेले असतात. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि थकलेलं शरीर पाहून बघणाऱ्यांना वाटतं की ही महिला काही करू शकणार नाही. पण पुढच्याच क्षणी सगळं चित्र बदलतं.

हातात खांब घेऊन ती महिला हळूहळू पोलच्या दिशेने धावते आणि उंच झेप घेत खेळ यशस्वीपणे पूर्ण करते. उडी मारताना ती बरोबर खांबाच्या दुसऱ्या बाजूला वळते आणि खाली टाकलेल्या गाद्यांवर उडी घेते. या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो, तर बघणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य. आजीबाईंचा हा पराक्रम सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यांच्या हिमतीचं अनेकांनी कौतुक केलंय.

हा व्हिडिओ @Senior Salute नावाच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ६.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "मी तरुणपणात म्हातारा होत चाललोय आणि आज्जी म्हातारपणात तरुण होत चाललीये." दुसऱ्या युजरने लिहिलं, "आज्जीबाईंची होती नव्हती तेवढी सगळी हाडं तुटली असावीत." तर आणखी एका युजरने लिहिलं, "त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने त्यांच्या मेहनतीचं चीज झालं."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ