बुधवार, 16 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:42 IST

अॅमेझॉनची सणासुदीआधी मोठी गुंतवणूक, २० फुलफिलमेंट सेंटर आणि १५० डिलिव्हरी स्टेशन नव्याने सुरू

सणासुदीच्या हंगामापूर्वी अॅमेझॉनने भारतातील आपल्या लॉजिस्टिक्स नेटवर्कचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार जाहीर केला आहे, ज्यात २० नवीन फुलफिलमेंट सेंटर, ६ सॉर्ट सेंटर आणि ११८ शहरांमध्ये १५० डिलिव्हरी स्टेशनचा समावेश आहे.

अॅमेझॉनची सणासुदीआधी मोठी गुंतवणूक, २० फुलफिलमेंट सेंटर आणि १५० डिलिव्हरी स्टेशन नव्याने सुरू
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

सणासुदीचा हंगाम तोंडावर आलेला असताना अॅमेझॉनने आज आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार जाहीर केला. यामध्ये कंपनी २० नवीन फुलफिलमेंट सेंटर (एफसी), ६ नवीन सॉर्ट सेंटर (एससी) आणि १५० नवीन लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन सुरू करणार आहे. या विस्तारामुळे अॅमेझॉनची एकूण साठवणूक क्षमता ५० टक्क्यांनी वाढून ६४ दशलक्ष घनफूट इतकी होणार आहे, म्हणजे ७२० पेक्षा जास्त ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूलएवढी जागा. या नवीन सेंटर्सचं संचालन आणि व्यवस्थापन लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीच्या भागीदार कंपन्या करणार आहेत.

यावेळी कंपनीने मेट्रो शहरांपलीकडे जाण्यावर विशेष भर दिला आहे. सगळे नवीन सॉर्ट सेंटर आणि सात नवीन फुलफिलमेंट सेंटर नॉन-मेट्रो शहरांमध्ये उभारले जात आहेत. यामध्ये रायपूर, रांची आणि वाराणसी इथं अॅमेझॉनचं पहिलंच फुलफिलमेंट सेंटर सुरू होणार आहे, त्यामुळे देशातल्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये कंपनीचं नेटवर्क आणखी मजबूत होईल. चिक्कबल्लापूर, हसन, मेरठ, रामनगर, रायपूर आणि वाराणसी इथं नवीन सॉर्ट सेंटर सुरू झाल्यामुळे वर्गीकरणासाठीचं एकूण क्षेत्रफळ २.४ दशलक्ष चौरस फुटांवरून २५ टक्क्यांनी वाढून ३ दशलक्ष चौरस फूट होणार आहे.

याशिवाय अॅमेझॉनने आसनसोल, भटिंडा, बिकानेर, कोईम्बतूर, डोडा, इटावा, गया, होसूर, जौनपूर, जुनागढ, मदुराई, नेल्लोर, पुरी, सिलीगुडी, सोलापूर, तिरुवन्नमलाई, तुमकूर, उधमपूर आणि वेस्ट गारो हिल्ससह ११८ शहरांमध्ये १५० नवीन लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन जोडली आहेत. यापैकी भोजपूर, बोकाजान, जालौन, जहानाबाद, नामसाई, पुरुलिया, रिभोई, सेनापती, शिवसागर, उदालगुरी, उखरुल आणि वोखा या १२ शहरांमध्ये अॅमेझॉनचं लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन पहिल्यांदाच सुरू होणार आहे. नेटवर्कमधील या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे गेल्या वर्षभरात सेम-डे डिलिव्हरी ३० टक्क्यांहून अधिक शहरांमध्ये पोहोचवणं शक्य झालं आहे.

हा विस्तार अॅमेझॉनने नुकत्याच जाहीर केलेल्या २,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा भाग आहे, जी भारतातील संपूर्ण ऑपरेशन्स नेटवर्क मजबूत करण्यासाठी केली जात आहे. यामुळे विक्रेत्यांची उत्पादनं ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचतील आणि अॅमेझॉनची लास्ट-माईल पोहोच वाढेल.

अॅमेझॉनचे भारत, एपीएसी, मिडल ईस्ट, तुर्किये आणि आफ्रिका येथील ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले, "अॅमेझॉनमध्ये आमचं नेहमी ग्राहक आणि विक्रेत्यांच्या अधिक जवळ जाण्यावर लक्ष केंद्रित राहिलं आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना अधिक वेगाने आणि खात्रीशीर सेवा देऊ शकतो. या वर्षी आम्ही आमच्या ऑपरेशन्स नेटवर्कला मजबूत आणि अपग्रेड करण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांना सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी २,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करत आहोत. यादरम्यान कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्यालाही पाठबळ दिलं जात आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी या नवीन सुविधा कार्यरत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे लाखो रोजगार संधी निर्माण होऊन देशभरातील स्थानिक घटकांच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ