तरुण आणि तेजस्वी त्वचेसाठी अभिनेत्री भाग्यश्री पिते हे घरगुती केशर पेय
त्वचेची चमक टिकवण्यासाठी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरण्याआधी घरगुती उपायांवर विश्वास ठेवा, असं अभिनेत्री भाग्यश्रीचं म्हणणं आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी म्हणून बायका सतत काही ना काही ट्रीटमेंट करत असतात. कधी बाजारात मिळणारे महागडे स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात, तर कधी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. प्रत्येकालाच आपली त्वचा देखणी आणि निरोगी दिसावी असं वाटतं. पण हवामानातल्या बदलांमुळे आणि केमिकल प्रॉडक्टच्या सततच्या वापरामुळे त्वचा डल आणि निस्तेज होत जाते. त्वचेला हवं तसं पोषण मिळालं नाही की त्वचेची क्वालिटी आणखी खराब होते.
सणासुदीच्या दिवसांत पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लीनअप, डी-टॅन असे अनेक उपाय केले जातात, पण त्याचा फार काही फरक दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घ्यायची असेल तर घरगुती उपायांवरच भर द्यायला हवा. त्वचा तरुण आणि तेजस्वी ठेवण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने एक नैसर्गिक पेय सुचवलं आहे, ते नेमकं कसं बनवायचं आणि त्यामुळे त्वचेला काय फायदा होतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.
धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं. याशिवाय कोरड्या त्वचेवर सतत वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा आणखी निस्तेज होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना आपल्या त्वचेला सूट होईल असंच स्किन केअर वापरावं. फक्त बाहेरून प्रॉडक्ट लावून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रोज सकाळी उठल्यावर केशराचं पाणी पिल्यास त्वचा आतून सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते, आणि त्वचेच्या इतर समस्याही कमी होतात.
हे नैसर्गिक ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात ५ ते ६ काड्या केशर टाकून १५ ते २० मिनिटं तसंच ठेवून द्यावं. केशर पाण्यात पूर्णपणे विरघळून त्याचा अर्क पाण्यात उतरला की मग हे पाणी प्यावं. सतत १५ दिवस हे केशराचं पाणी प्यायल्यास त्वचेत अनेक चांगले बदल दिसू लागतात आणि त्वचा चमकदार दिसते. केशर पाण्यामुळे त्वचेची चमक वाढते, तसंच पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचं टेक्स्चरही सुधारतं.
केशर हे त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानलं जातं. यामध्ये क्रोसिन नावाचं एक अॅक्टिव्ह कम्पाऊंड असतं. याशिवाय त्यातील अँटी-ऑक्सिडंट घटक शरीराचं फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान टाळण्यास मदत करतात. त्वचेवरची नॅचरल चमक वाढवण्यासाठी आहारात केशराचा समावेश केला जावा. चेहऱ्यावर वाढलेलं पिगमेंटेशन हळूहळू कमी होण्यासही याने मदत होते. केशरातील अॅक्टिव्ह कम्पाऊंड्स मेलेनिन तयार होण्याची प्रक्रिया कमी करतात, त्यामुळे चेहऱ्यावर लगेच काळे डाग येत नाहीत.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.