गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:06 IST

'आई तुळजाभवानी'त बालगणेशाची एन्ट्री, AI-VFXने उभा केला गजमुख

'आई तुळजाभवानी'त बालगणेशाची एन्ट्री, AI-VFXने उभा केला गजमुख
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' ही मालिका सध्या गणेश आगमनाच्या खास प्रोमोमुळे चर्चेत आहे. या प्रोमोत साकारलेलं गजमुख प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. गणेशाची हलणारी सोंड आणि त्याच सोंडेने मोदक घेण्याचा प्रसंग इतका प्रभावी झालाय की, यामागचं AI आणि VFX तंत्रज्ञान सगळ्यांना दिसतंय.

मालिकेच्या पुढच्या कथानकात तुळजापुरात बालगणेशाचं खट्याळ आणि गोड आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशाच्या या एन्ट्रीनंतर मालिकेत आणखी कोणकोणत्या घडामोडी घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

'आई तुळजाभवानी' ही मालिका सुरुवातीपासूनच VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या वेगळ्या प्रयोगांसाठी ओळखली जाते. AIच्या मदतीने व्यक्तिरेखा उभ्या करण्यापासून खऱ्या कलाकारांचा आणि AI व्यक्तिरेखांचा संवाद घडवण्यापर्यंत वेगवेगळे तांत्रिक प्रयोग या मालिकेत आधीपासून केले गेलेत. पौराणिक आणि दैवी प्रसंग जास्त प्रभावी करण्यासाठीही मालिकेत AIचा वापर झाला आहे. आता गणेश आगमनासाठी तयार केलेल्या गजमुखामुळे या प्रयोगांत आणखी एक नवा टप्पा जोडला गेलाय.

गजमुखाची रचना, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि खासकरून सोंडेच्या हालचाली खऱ्याखुऱ्या वाटाव्यात, यासाठी टीमने बराच वेळ काम केलं. AIच्या मदतीने वेगवेगळी रूपं तयार करून त्यातून योग्य रूप निवडलं गेलं आणि नंतर VFXने त्याला जिवंतपणा दिला. गणेशाने सोंडेने मोदक घेण्याचा प्रसंग खरा आणि विश्वासार्ह वाटावा, यासाठी विशेष मेहनत घेतली गेली आहे. त्यामुळेच हा प्रसंग मालिकेच्या प्रोमोतलं खास आकर्षण बनलाय.

मालिकेचे VFX दिग्दर्शक प्रदीप भगत यांनी या प्रयोगाबद्दल सांगितलं की, 'आई तुळजाभवानी' ही मालिका त्यांच्या कुलदैवतावर आधारित असल्यामुळे हा प्रकल्प केवळ व्यावसायिक काम नाही, तर श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवीचं तेज, दैवी रूप आणि कथांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेश आगमनाचा प्रसंगही खास असल्याचं सांगत, गजमुखाचं रूप जिवंत, लोभस आणि नैसर्गिक वाटावं यासाठी त्याच्या रचनेपासून सोंडेच्या हालचालींपर्यंत प्रत्येक बारकाईवर काम केल्याचं त्यांनी नमूद केलं.

मालिकेच्या VFXची जबाबदारी फ्लेमिंगोज VFX या निर्मिती संस्थेकडे आहे. या संस्थेने आधी 'विक्रम वेधा', 'राधा रमण' यांसारख्या चित्रपटांसोबतच 'असुर', 'फर्जी', 'ताज', 'सिटाडेल' आणि 'गन्स अँड गुलाब्स' यांसारख्या वेबसीरिजसाठी VFXचं काम केलंय. 'स्वराज', 'इमली', 'नजर', 'जादू है जिन्न का' आणि 'विद्रोही' यांसारख्या हिंदी मालिकांतही या संस्थेने काम केलं आहे. मराठीतली 'आई तुळजाभवानी' ही त्यांची पहिली मालिका आहे.

दरम्यान, पहिल्या भागापासून आतापर्यंत ६८०हून अधिक भागांचा टप्पा गाठलेल्या 'आई तुळजाभवानी'त VFX आणि AI तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर होत आलाय. आता बालगणेशाच्या आगमनामुळे मालिकेतले पुढचे भाग आणखी रंजक होण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ