BMW i7 M70 xDrive भारतात दाखल; 686 किमी रेंज, किंमत 2.65 कोटी
BMW ने आपली नवी इलेक्ट्रिक लक्झरी सेडान i7 M70 xDrive भारतीय बाजारात आणली असून बुकिंग सुरू झाले आहे.
BMW कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक लक्झरी सेडान i7 M70 xDrive भारतात लॉन्च केली आहे. 7-Series कुटुंबातील ही गाडी BMW ने Rs 2.65 कोटी एक्स-शोरूम किंमतीत उतरवली आहे. देशभरातील BMW डीलरशिपवर सध्या या कारचे बुकिंग सुरू असून ऑक्टोबर 2026 पासून ग्राहकांना डिलिव्हरी मिळायला सुरुवात होणार आहे. लक्झरी फीचर्ससोबतच स्पोर्ट्स कारसारखी परफॉर्मन्स हे या गाडीचे खास वैशिष्ट्य आहे.
डिझाइनबाबत बोलायचं झालं तर कारला आक्रमक आणि आकर्षक लूक देण्यात आला आहे. पुढच्या बाजूला BMW ची Iconic Glow Kidney Grille असून त्यावर M लोगो आणि डार्क इल्यूमिनेशन दिलेलं आहे. स्मोक-ब्लॅक क्रिस्टल हेडलाइट्स, नवीन M Exterior Mirrors, Black High-Gloss Seahorse Stripes आणि रुंद Rear Diffuser यामुळे गाडीचा स्पोर्टी लूक अजून खुलतो. Black Sapphire रंगातलं Rear Spoiler गाडीला आणखी स्पोर्टी टच देतं.
केबिनमध्ये गेल्यावर लक्झरीचा वेगळाच अनुभव येतो. BMW Individual Merino Leather Upholstery, CraftedClarity Glass Applications आणि Panoramic Glass Roof Sky Lounge यांसारखी फीचर्स आहेत. पुढच्या आणि मागच्या सीट्सवर व्हेंटिलेशन, हीटिंग, मसाज आणि लंबर सपोर्ट मिळतो. मागच्या प्रवाशांसाठी Executive Lounge Seating असून सीट 43 डिग्रीपर्यंत झुकवता येते. लांबच्या प्रवासात आराम मिळावा म्हणून Gap-Free Calf Support आणि Heel Rest सारख्या सुविधाही दिल्या आहेत.
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत गाडीत BMW Panoramic Vision, Head-Up Display आणि 17.9 इंचाचा Free-Cut Central Touchscreen आहे. गाडी BMW Operating System X वर चालते. मागच्या प्रवाशांसाठी तब्बल 31.3 इंचाचा Ultra-Wide 8K BMW Theatre Screen दिलेला आहे, त्यासोबत Bowers & Wilkins चं 35-Speaker, 1965-Watt Diamond Surround Sound System आणि Dolby Atmos पण मिळतं.
गाडीत 112.5kWh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली असून WLTP सायकलनुसार एका चार्जमध्ये ती 686 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टममुळे 1100Nm पर्यंत टॉर्क तयार होतो आणि वजनदार लक्झरी सेडान असूनही ही गाडी अवघ्या 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. BMW च्या M Division ने केलेल्या इंजिनीअरिंगमुळे गाडीत M-Specific Adaptive 2-Axle Air Suspension, Rear-Axle Steering, Adaptive M Chassis Control Professional, M Launch Control आणि Black High-Gloss Calipers असलेले M Sport Brakes मिळतात. गाडीला 21-इंच M Light-Alloy Wheels बसवली आहेत.
सेफ्टीसाठी Parking Assistant Professional, Surround View Camera, Reversing Assistant Professional आणि स्मार्टफोनवरून Remote Parking ची सुविधा आहे. याशिवाय Driving Assistance Plus, Lane Change Warning, Rear Crossing Traffic Warning, Active Protection आणि Tyre Pressure Monitoring System सारखी फीचर्सही आहेत.
गाडीसोबत 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी मिळते, तर बॅटरीसाठी 8 वर्षे किंवा 1,60,000 किमीपर्यंत वॉरंटी आहे. 2 वर्षांसाठी 24x7 Roadside Assistance पण दिलं जातं. BMW Service Inclusive चे पर्यायही उपलब्ध असून गरजेनुसार वॉरंटी 10 वर्षांपर्यंत वाढवता येते.